Winter Session 2022 | ठाकरे गटाला आणखी एक धक्का! विधानसभेच्या तालिका सभाध्यक्षांच्या यादीतून केले बेदखल…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन | राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) काल (सोमवारी) नागपूर येथे सुरू झाले. यादरम्यान विरोधकांकडून विविध मुद्यांवर राज्य सरकारला कोंडीत पकडण्यात आले. राज्य सरकारने देखील काही प्रश्नांची चोख उत्तरे देत विरोधकांचे प्रश्न धुडकावून लावले. या अधिवेशनादरम्यान (Winter Session 2022) ठाकरे गटाला एक धक्का बसला आहे. ठाकरे गटातील आमदाराचे नाव तालिका सभाध्यक्षांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. तसेच जाहीर विधानसभाध्यक्षांनी जाहीर केलेल्या नावांमध्ये ठाकरे गटातील एकाही सदस्याचा समावेश नाही.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच विधानसभा तालिका सभाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. यात ठाकरे गटातील एकाही सदस्याचे नाव नाही. तालिका सभाध्यक्ष म्हणून शिंदे गटाचे संजय शिरसाट, भाजपचे समीर कुणावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल भुसारा आणि काँग्रेसचे सुभाष धोटे यांच्या नावाच्या घोषणा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

त्यादरम्यान हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या कामांना स्थगिती दिल्याच्या कारणावरून चांगलाच गाजला.
त्याविरूध्द महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली.
यावर उत्तर देताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी देण्यात आलेली ७० टक्के
विकास कामे परत सुरू केली असून इतर विकासकामांबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन
दिल्यानंतरही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणाबाजी सुरूचं ठेवली.

तसेच हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील
यांनी सभागृहात स्थगण प्रस्ताव आणत कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य केले. त्यांनी यावेळी कर्नाटक जसे वागत
आहे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे अशी भूमिका राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी केली.
तर आमदार हसन मुश्रीफांवर झालेला हल्ला अतिशय निंदनीय असल्याचे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.
कर्नाटकातील मराठी नेत्यांना जेरबंद केले जात आहे.
हे देखील खपवून घेतले जाणार नसल्याचे ते यावेळी बोलताना सभागृहात म्हणाले.

Web Title :- Winter Session 2022 | maharashtra winter session 2022 shivsena uddhav balasaheb thackeray group ousted from list of table chairpersons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winter Session -2022 | ‘कोयता गँग’मधला अल्पवयीन मुलांचा समावेश गंभीर मुद्दा, पुणे शहर व परिसरातील ‘कोयता गँग’च्या गुंडांची दहशत रोखा; अजित पवारांची सभागृहात मागणी

Gram Panchayat Election Result 2022 | निवडणूक निकालानंतर झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यु; जळगाव येथील घटना…

Ajit Pawar | अधिवेशनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी