home page top 1

प्रियकराच्या मदतीने पतीला केले नपुंसक

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – प्रियकराच्या मदतीने पत्नीने लष्करात नोकरीत असलेल्या पतीच्या गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग करून त्याला नपुंसक केले. तसेच सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पत्नी व तिच्या नात्यातीलच प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, लष्करात नोकरीत असलेल्या जवानाच्या पत्नीचे तिच्या नात्यातील एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. एकदा पत्नीने पतीला गुप्तांगावर लावण्यासाठी एक क्रीम दिली. त्या क्रीमच्या केमिकलचा परिणाम होऊन पतीच्या गुप्तांगाला गंभीर इजा झाली व काही दिवसानंतर ते नपुसंक झाले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर पती-पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पत्नीने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार हे करीत आहेत.

Loading...
You might also like