महानायक अमिताभच्या मदतीने ५० शेतकरी कर्जमुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यभर कर्जापोटी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी विक्रमी आकडा गाठला असताना महानायक अमिताभ बच्चन यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दु:खावर आपल्यापरीने फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. बच्चन यांनी १ कोटी २५ लाख रुपये ५० कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरून त्यांना कर्जमुक्त केले आणि पडद्यावरच नव्हे तर आपण प्रत्यक्ष आयुष्यातही महानायक असल्याचे सिद्ध केले आहे.

[amazon_link asins=’B074RHZF9T,B06XWHSKZZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d22a385-ab52-11e8-a746-9f51f5f1a61b’]

सर्व सामान्यांना करोडपती होण्याचे स्वप्न दाखवणारा कौन बनेगा करोडपती हा रिअ‍ॅलिटी शो लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे यंदाचे दहावे पर्व आहे. यानिमित्त घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी २०० शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यामागे असलेले कर्जाचे कारण, या बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे बच्चन म्हणाले.

मी अनेक सामाजिक मोहिमांशी जोडला गेलेलो आहे. त्यात स्वच्छ भारत, बेटी बचाओ आदी मोहिमा आहेत. पण, आता मला शेतकऱ्यांसाठीही काम करायचे आहे. यापूर्वीही ५० शेतकरी कुटुंबांची कर्जफेड केली आहे, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

शहीद सैनिकांच्या कटुंबीयांसाठी देखील बच्चन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ४४ शहीद सैनिक कुटुंबांचा यात समावेश आहे. यात शहीद जवानांच्या पत्नीसाठी ६०, वडिलांसाठी २० आणि इतर कटुंबीयांसाठी २० अशा टक्केवारीमध्ये ही मदत दिली जाईल.

किल्ले रायगडदर्शन महागले, प्रवेशशुल्कात १० रुपयांनी वाढ