क्रिडा विश्‍वात प्रचंड खळबळ : ब्राझीलच्या स्टार फुटबॉलपट्टूवर बलात्काराचा आरोप

ब्राजील : वृत्तसंस्था – ब्राझील फुटबॉल संघाचा स्टार स्ट्राइकर नेमारवर एका अज्ञात महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. नेमार याने पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये बलात्कार करून मारहाण केल्याचा आरोप महिने केला आहे.

नेमारने महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. तर नेमारच्या वडिलांनी ही महिला खोटे आरोप करून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे.पीडित महिला ब्राजीलची राहणारी आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, नेमार आणि माझी ओळख इंस्टाग्रामवर ओळख झाली. यानंतर आम्ही एकमेकांना मेसेज पाठवू लागलो.

एके दिवशी नेमार याने पॅरीस येथे येणार का अशी विचारणा केली. त्याच्यावर विश्वास ठेवून मी त्याला होकार दिला. पॅरीस येथील हॉटेलमध्ये नेमार नशेच्या धुंदीत आला. त्याने माझ्यासोबत अश्लील भाषेत संवाद साधू लागला. तसेच त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केला असता त्याने मारहाण करून बलात्कार केला.

दरम्यान, नेमारच्या वडिलांनी पीडित महिलेने खोटे आरोप केले आहेत. नेमार अशा प्रकारचे कृत्य करू शकत नाही. नेमार हा फक्त एकदाच या महिलेसोबत डेटवर गेला होता. त्यानंतर तो तिला भेटला देखील नाही. या महिलेने पैशांसाठी आपल्या मुलावर खोटे आरोप लावले असून ती ब्लॅकमेल करीत आहे.

नेमारला कप्तान पदावरून डच्चू

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, हा प्रकार १५ ते १७ मेच्या दरम्यान घडला आहे. महिलेने ३१ मे रोजी ब्राझीलमध्ये तक्रार नोंदवली आहे. नेमार सध्या ब्राझीलमध्ये असून तो कोपा अमेरिका फुटबॉल टूर्नामेंटची तयारी करीत आहे. ही टूर्नामेंट १४ जून ते ७ जुलै दरम्यान होणार आहे. या आरोपानंतर नेमारची ब्राझील फुटबॉल टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात आले आहे. त्याच्या जगेवर डानी एल्वेस याची नियुक्ती केली आहे.