‘अश्‍लील’ व्हिडीओ बनवून तिनं युवकाला गंडवलं, मागितले 15 लाख रूपये

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अनेक प्रकरणांमध्ये पुरुषांकडून अश्लील व्हिडीओ बनवले जातात आणि महिलेकडे पैशांची मागणी केली जाते. मात्र मुरादाबादमधील संबळ मध्ये एक अजबच प्रकार घडला आहे. इथे चक्क एका महिलेने आपल्या काही मित्रांच्या मदतीने एका तरुणाला प्रेम जाळ्यात फसवले. त्याला काही दिवस डांबून ठेवले. त्याचा एक अश्लील व्हिडीओ तयार करून त्याच्या परिवार जणांकडे १५ लाखाची मागणी केली.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संबंधितांना अटक केली. तसेच तरुणाला महिलेच्या जाळ्यातून मुक्त केले. महिलेकडून फसवणूक केला गेलेला युवक जनपथ शहाजहानपूरचा राहणारा आहे. ब्लॅकमेलिंगचा प्रकार नखासा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. असे सांगितले जात आहे की, आरोपी महिला मूळची शहाजहांपूरचीच आहे.

१५ लाखाची मागणी केली होती
आरोपी महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा प्रकार केला होता. आरोपींनी पीडित तरुणाच्या परिवाराकडे वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून १५ लाख रुपयांची मागणी केली. पीडित तरुणाच्या परिवार जणांकडून पैसे न दिल्यामुळे तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. ब्लॅकमेलर्सच्या त्रासाला कंटाळून पीडित परिवाराने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरण आपल्या हातात घेऊन सर्व आरोपींना अटक केली.

तसेच तरुणाला महिलेच्या जाळ्यातून मुक्त केले. घडलेल्या प्रकारची माहिती देताना अप्पर पोलीस अधिक्षक अलोक कुमार जयस्वाल यांनी सांगितले की, आरोपीना अटक करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. तसेच त्यांना तुरुंगात पाठवले जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –