home page top 1

हिंजवडीतील उच्चभ्रू सोसायटीत कागदावर इंग्रजीमध्ये अश्लिल मजकूर, विचारलं ‘तुझा रेट काय’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हिंजवडीतील एका हाय क्लास सोसायटीत एकाने कागदावर इंग्रजीमध्ये अश्लिल मजकूर लिहून तुझा रेट काय अशी चौकशी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी एकावर विनयभंगाचा मजूकर लिहिला आहे. हा प्रकार हिंजवडीतील नेरे येथील एक्सरबिया टाऊनशिपमध्ये घडला आहे.

याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, एक्सरेबिया टाऊनशिप हिंजवडीतील हायक्लास सोसायटीत ही महिला राहत आहे. तिचे तिच्या पतीविरोधात भांडणे सुरु असतात. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या घराच्या दारात एक कागद टाकलेला आढळून आला. त्यावर सेक्स आणि वन नाईटसाठी शुल्क असल्यास आणि तुमचे उत्तर होय असेल तर हा कागद तसाच ठेवून त्यावर होय असे लिहा. हा कागद तसाच दरवाजाबाहेर ठेवा व त्याच्यावर होय किंवा नाही असे उत्तर लिह. असे त्यावर इंग्रजीत लिहिलेले होते.

त्यानंतर १७ सप्टेंबरला त्यांच्या मोबाईलवर एकाने व्हाटसअपवर अश्लिल मेसेज पाठवून त्यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही व्यक्ती सोसायटीतीलच कोणीतरी असल्याचा संशय आहे.

Visit :- policenama.com

Loading...
You might also like