मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी आलेल्या महिलेने दिला मुलाला जन्म, नाव ठेवले ‘इम्तिहान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एमडीडीएम महाविद्यालय परीक्षा केंद्रात मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी आलेली एक महिला अचानक प्रसुतीच्या कळामुळे ओरडू लागली. तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले, तिथेच तिने संध्याकाळी मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव तिने ‘इम्तिहान’ ठेवले आहे.

तासाभर दिली होती परीक्षा

एमडीडीएम महाविद्यालय परीक्षा केंद्राचे अधीक्षक डॉ.मीरा मधुमिता म्हणाल्या की, या महाविद्यालयात मॅट्रिक परीक्षा केंद्र बनविण्यात आले आहे. शुक्रवारी दुसऱ्या शिफ्टदरम्यान शांती देवी नावाच्या एका महिलेला तासभर परीक्षा दिल्यानंतर अचानक प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. अ‍ॅनिगिलेटरने तातडीने याची माहिती दिली. यानंतर शांती यांना स्वतंत्र कक्षात बोलावून जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. त्यांच्या सूचनेनंतर शांती यांना रुग्णवाहिकेतून सदर रुग्णालयात पाठवले गेले, तेथे तिने सायंकाळी उशीरा मुलाला जन्म दिला.

मुलाच्या जन्मामुळे शांती आनंदी आहे. शांतीचे पती बिरजू साहनी म्हणतात की, प्रसूती वेदना होण्यापूर्वी तिनेे ओबजेक्टिव्ह प्रश्न सोडविले होते. ते म्हणाले की, आई व मुल दोघेही निरोगी आहेत. शांतीचे पती म्हणतात की परीक्षेच्या वेळी देवाने त्याला एक मुलगा दिला आहे, म्हणूनच त्याला ‘इम्तिहान’ असे नाव देण्यात आले आहे. शांतीला पुढील शिक्षण घेऊन नोकरी करायची आहे.