दुर्दैवी ! मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. 13) सकाळी कोहळी (ता. अथणी) येथे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सरस्वती श्रीकांत आलगुर (वय 28) असे मयत महिलेचे नाव आहे. ऐगळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती आलगुर ही शनिवारी सकाळी शेतात खपली गव्हाची मळणी करण्यासाठी गेली होती. मळणी करताना उडणारे कण नाकातोंडात जाऊ नये म्हणून तिने तोंडाला रुमाल बांधला होता. त्यावेळी त्याचा पदर थोडा लांब होता. वाऱ्यामुळे उडून तिचा पदर मशीनमध्ये खेचला गेला. त्यामुळे ती मशिनमध्ये अडकली. त्यातून बाहेर पडणे कठीण झाले. यावेळी तिच्या हाताच्या चिंधड्या उडाल्या. गंभीर अवस्थेत तिला दवाखान्यात दाखल केले. पण काही वेळातच तिचा मृत्यू झाला. ऐगळी पोलिस अधिक तपास करत आहेत.