‘मुलांनो इकडं पाहू नका’ असं म्हणत मालकीण सुरू झाली ड्रायव्हरसोबतच, गाडीमध्येच केलं KISS…

बंगळूरू : वृत्तसंस्था – बंगळूरूमध्ये एका महिलेचे आपल्या ड्राइव्हरवर प्रेम झाले. इतकेच नाही तर महिलेने आपल्या मुलांसमोर ड्रायव्हरला किस केले. जेव्हा महिलेने पाहिले की तिची मुले तिच्याकडे पहात आहेत, तेव्हा ती म्हणाली, माझ्याकडे पाहू नका. आपले काम करा. महिलेच्या नवऱ्याने तिच्यापासून घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला होता. घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावण्यासाठी महिलेने कोर्टाला अपील केले, पण आता कोर्टाने महिलेचे अपील फेटाळले आहे.

मुलांच्या वडिलांनी महिलेपासून घटस्फोटाची मागणी केली आहे. मुलांनाही वडिलांसह राहायचे आहे कारण त्यांचे त्या महिलेसोबत भविष्य दिसत नाहीये. घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान, किशोरवयीन मुले (मुलगा आणि मुलगी) यांनी महिला आणि ड्रायव्हर यांच्यामध्ये कोर्टात अनैतिक संबंध असल्याचा पुरावा ठेवला.

हा पुरावा पाहिल्यानंतर न्यायमूर्ती पी.बी.बजंत्री आणि नटराज रंगस्वामी यांनी नंतर सांगितले की ही महिला खूप निर्दयी आहे. यामुळे, एक आनंदी कुटुंब नष्ट झाले आहे. या महिलेने तिच्या आनंदासाठी पती आणि मुलांचे जीवन खराब केले आहे.

हे प्रकरण २०१३ पासून न्यायालयात चालले होते. पण जेव्हा मुलांनी त्या महिलेला ड्रायव्हरला किस करतांना बघितले आणि पुरावा कोर्टात ठेवला तेव्हा कोर्टाने मुलांच्या वडिलांच्या बाजूने हा निर्णय दिला.

मुलांनी कोर्टात सांगितले की त्यांची आई प्रथम त्यांना आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेली. त्यांच्यासोबत तिचा प्रियकर ड्रायव्हरही होता. मग त्या बाईंनी मुलांना सांगितले की तुम्ही दोघे १०-१५ फूट अंतरावर बसा. मग ती महिला आणि ड्रायव्हर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि बराच वेळ एकमेकांना किस करत होते. मग ती महिला म्हणाली की तुम्ही दोघे आमच्याकडे पाहू नका.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/