धक्कादायक ! पतीसमोरच ५ जणांनी केला सामूहिक ‘बलात्कार’

अलवार : वृत्तसंस्था – राजस्थानमधील अलवार येथे एका महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले. आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणा मुळे राजस्थानमध्ये खळबळ माजली आहे.

अलवार जिल्ह्यातील ही महिला २६ एप्रिल रोजी आपल्या पतीसमवेत दुचाकीवरून चालली होती. यावेळी पाच तरुणांनी दुचाकीवर त्यांचा पाठलाग केला आणि चाकूच्या धाकाने त्या महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला. तसेच याविषयी कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली नाही, मात्र त्यांनी फोनवरून धमकी देण्याचे चालूच ठेवल्याने अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अपहरण, बलात्कार, अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असुन अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Loading...
You might also like