पोलीस पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन डांबून केली मारहाण

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे)-गावाकडे जमिन घेण्यासाठी  माहेरून दहा लाख रूपये आणावेत म्हणून पोलीस पत्नीला मारहाण करत तीच्या चारीत्र्यांवर संशय घेवुन पत्नीला शारिरिक व माणसिक त्रास देणारा पती व त्याचे आई, वडील, भाऊ यांचेसह बाराजणां विरोधात इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये पत्नीने फिर्याद दाखल केली आहे.

बिसमिल्ला अमजद शेख (वय २७ वर्षे, रा. भोडणी- बोकडदरा, ता.इंदापूर, जि. पूणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बिसमिल्ला अमजद शेख या बीबेवाडी पोलिस स्टेशन येथे महिला शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांचे लग्न अमजद इकबाल शेख (रा.भोडणी, बोकडदरा ता. इंदापूर) याचेशी ०२ ऑगस्ट २०१८ रोजी  मुस्लिम रितीरिवाजा प्रमाणे झाले आहे. लग्नात पतीला चार लाख रूपये रोख व चार तोळे सोने हुंडा म्हणून देण्यात आले होते. लग्नानंतर भोडणी गावी सासरी आठ दिवस घरातील लोकांनी चांगली वागणूक दिली. परंतु लग्नाचे आठ दिवसानंतर पती अमजद शेख यांने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण व शारिरिक, मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. पतीबरोबर सासु , सासरे व दिर यांनी मारहाण करून उपाशी ठेवले व मानसीक छळ केला.

एक महिन्यानंतर फिर्यादी व त्यांचे पती पुणे येथील सोमवार पेठ येथे राहण्यास आले. पुणे येथे आल्यावर पतीने पत्नीवर पुन्हा चारित्र्याचा संशय घेवून मारहाण व दमदाटी केली. तसेच ०२ नोव्हेंबर २०१८ रोजी पतीने त्यांना कामावर जाऊ दिले नाही. त्याच दिवशी जबरदस्तीने पत्नीला सासरी भोडणी- बोकडदरा येथे नेवून जमीन घेण्यासाठी माहेरून १० लाख रूपये घेवून ये म्हणून छळ केला.

१२ नोव्हेंबर २०१८ रोजी चारित्र्याचा संशय घेवून पती अमजद इकबाल शेख, सासु रबाना शेख, सासरे इकबाल शेख, दीर सुरज शेख, चुलत सासरा इसुब शेख (सर्व रा. भोडणी-बोकडदरा, ता.इंदापूर) व चुलत सासु मुन्नी इसुब शेख (रा. अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) पतीची मावशी मदना मुलाणी, काका चंदुभाई मुलाणी (दोघे रा. उंबरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) नवर्‍याची आत्या शबाना जमादार, आत्याचा नवरा जमादार मामु, नवर्‍याची चुलत चुलती रूक्साना, दुसरी चुलत चुलती सलमा असे सर्वजन मिळून एकूण बारा जणांनी मिळून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करून फिर्य़ादी यांच्या जवळ असलेले १५ तोळे सोने काढून घेतले. जीवे मारण्याची धमकी देवुन चार दिवस घरात डांबुन ठेवले. तसेच माझा दीर व सासरा यांनी मला मारहाण करून अंगावरील कपडे फाडले व हाताला धरून ओढले. आणी मनाात लज्जा उत्पन्न होईल अशा अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली.

दिनांक १२ नोव्हेंबर रोजी फिर्य़ादी यांचे आई, वडील व मेव्हुणे हमजू इनामदार भेटायला आले होते. त्यांनी फिर्यादीला डांबुन ठेवलेल्या खोलीतून बाहेर काढले. त्यावेळी वरील सर्वांनी आई वडील यांना शिविगाळ, दमदाटी व हाताने धक्का बुक्की केली. त्याच दिवशी फिर्यादी यांचे आई वडील व मेव्हुणा परत घरी गेल्यानंतर वरील सर्वांनी पुन्हा मारहान करून घरातुन हाकलून दिले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन इंदापूर पोलिसांनी १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.