कात्रजमध्ये पाण्याच्या टाकीत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील कात्रज परिसरामध्ये एका महिलेचा खून करुन पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिला. पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आल्याने कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना आंबेगाव येथील एका सोसायटीत उघडकीस आली आहे.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0dc43f57-a85d-11e8-b74b-f9d2d4734a7c’]

मिळालेल्या माहितीनुसार, सपना तमांग (वय-४२) असे मृत महिलेचे नाव आहे. आंबेगाव येथील एका सोसायटीच्या पाण्याच्या टाकीमध्ये महिलेचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढून मृतदेह ससून रुग्णालायात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत महिलेच्या शरिरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत.

दरम्यान, सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. अनैतिक संबंधातून हा खून करुन मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बातम्या

नालासोपारा स्फोटकप्रकरणात घाटकोपरमधून आणखी एक अटकेत

ठेवीदारांना कोट्यावधीचा चुना लावणाऱ्या दिलीप आपेटला पुण्यातून अटक