‘या’ दोन धडाकेबाज महिलांनी केले अशक्य ते शक्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात स्त्री पुरुष समानतेचे अविष्कार आज पाहण्यास मिळाला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून लष्कराच्या कार्यवाहीचे नेतृत्व केले आहे. तर सुषमा स्वराज यांनी सर्व पक्षीय बैठक घेऊन सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनधींना भारतीय हवाई दलाच्या कार्यवाहीची माहिती दिली आणि सर्व पक्षांचा पाठींबा देखील मिळवला आहे. म्हणूनच भारताच्या महिलांची निडरता आणि नेतृत्व निपुणता आज दिसून आली आहे.

आज पहाटे साडे तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी वार रूम मध्ये बसून हवाई दलाच्या लष्करी कार्यवाहीचे नेतृत्व केले आहे. आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि हजर जबाबीपणामुळे सीतारामन या सुपरिचित आहेत. परंतु आता त्यांनी संरक्षण खात्याला तडफदार नेतृत्व देऊन हे देखील दाखवून दिले आहे कि भारतीय महिला या निडर कार्यशैलीच्या असतात.

तसेच आज मंगळवारी सायंकाळी नवी दिल्ली या ठिकाणी सर्वपक्षीय बैठकीला संबोधित करण्याचे नेतृत्व सुषमा स्वराज यांनी केले. हवाई दलाच्या लष्करी कार्यवाही बद्दल सुषमा स्वराज यांनी सर्वपक्षांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. तसेच देशातील सर्वच पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेण्यात सुषमा स्वराज यशस्वी झाल्या आहेत. या बैठकीला राजनाथ सिंह, अरुण जेटली, विजय गोयल यांच्या सह सर्वच मोठ्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वपक्षांच्या नेत्यांनी भारतीय वायुदलाचे अभिनंदन केले तसेच लष्कराच्या कार्यवाहीला पाठींबा देखील दिला आहे.