पुरूषांच्या तुलनेत महिलांना मधुमेहाचा धोका अधिक असतो

पुणे  :  पोलीसनामा आॅनलाईन – तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल परंतु पुरूषांच्या तुलनेत महिलांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत. धकाधकीची जीवनशैली, तणाव आणि लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे महिलांमध्ये मधुमेहाची लक्षणं जास्त आढळून येत आहेत. याचेही एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे स्त्रीचं आपल्या कुटुंबासाठीच झोकून देणं याच कारणांबाबत अनेक तज्ज्ञांनी बोलताना सांगितले की, अनेक महिला आपल्या प्रकृतीपेक्षा आपल्या कुटुंबाच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष देतात. घरातील सर्वांच्या गरजा पूर्ण करता करता आपल्या प्रर्कृतीकडे मात्र दुर्लक्ष करतात. याव्यतिरिक्त अनेक महिला आपल्या मेडिकल टेस्ट करत नाहीत. त्यामुळे अनेकदा या आजारांची लक्षणं लक्षात येत नाहीत. अशा प्रकारे या ना त्या कारणाने पुरूषांच्या तुलनेत महिलांना मधुमेहाचा धोका अधिक असतो.
अनेक रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, डिप्रेशनमुळे अनेक अनेक महिलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो. सध्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, सतत कामाचा ताण यांमुळे अनेक लोक डिप्रेशनमध्ये आहेत. या आजाराचे परिणाम पुरूषांच्या तुलनेत मधुमेहाने पीडित असलेल्या महिलांवर जास्त होतो. महत्त्वाची बाब अशी की, गर्भकालीन मधुमेह असलेल्या महिलांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. अशा महिलांना भविष्यात मधुमेह होण्याचा धोक वाढतो. नमूद करण्यासारखी बाब अशी की, मधुमेहाने पीडित असलेल्या पुरूषांच्या तुलनेत महिलांना हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोका अधिक असतो. कारण अनेक रिसर्चमधून तसे सिद्ध झाले आहे.
अनेक महिलांना अनेक वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. अशातच असे काही आजार आहेत की, ज्यामुळे मधुमेहाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता असते. याचेच एक उदाहरण द्यायचे झाले तर ते म्हणजे ‘पीसीओडी’ हे होय. सध्या अनेक महिलांना पीसीओडीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. असे असणे ही एक चिंताजनक बाब आहे. कारण एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, पीसीओडी असणाऱ्या महिलांमध्ये मधुमेहाचा धोका अधिक असतो.
Loading...
You might also like