धक्कादायक ! पतीचे छाटलेले ‘मुंडके’ हातात घेऊन पत्नी झाली ‘सरेंडर’

लखीमपूर : वृत्तसंस्था – वरंवार होणाऱ्या पतीच्या अत्याचाराला वैतागलेल्या पत्नीने चक्क पतीचा शिरच्छेद केला आणि तेच शीर घेऊन पत्नी पोलीस ठाण्यात पोहचली. या महिलेने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. ही घटना आसामच्या लखीमपूरमधील असून या महिलेचे नाव गुनेश्वरी बरकाटकी आहे. तर मृत पतीचे नाव मुधिराम आहे. याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, गुनेश्वरी यांना पाच मुले आहेत. गुरुवारी त्यांनी कुर्‍हाड्याने आपल्या पतीचा खून केला आणि पाच किमी दूर पोलीस स्थानकात एका प्लास्टिकच्या पिशवीत पतीचे मुंडके घेऊन गेल्या. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की ” “अनेकवेळा त्याने कुर्‍हाडीने आपल्याला जखमी केले. त्याला सोडून जाण्याचा मी खूप विचार केला, परंतु मुलांचा विचार करून मी गप्प होते.” परंतु ही गोष्ट हाताबाहेर गेली होती. आता जर मी त्याला मारले नसते तर त्याने माझा खून केला असता असेही गुनेश्वरी म्हणाल्या. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.