खळबळजनक ! MIM नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या ‘त्या’ महिलेचा खून

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – MIM नगरसेवकाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती.

रेश्मा पडनेकूर असे या महिलेचे नाव आहे. तर तिने एमआयएमचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती.

रेश्मा यांचा मृतदेह काल रात्री विजयपूर जवळील कोलार गावात मिळाला आहे. त्यांनी १७ एप्रिल रोजी तौफिक शेख यांच्याविरोधात तक्रार दिली होती. तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. पोलीस तेव्हापासून त्यांचा शोध घेत होते. गुरुवारी त्यांचा मृतदेह सापडला. दरम्यान त्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे तौफिक शेख यांच्यावर संशयाची सूई आहे. तौफिक शेख आणि रेश्मा यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा होती. त्यामुळे शेख यांच्या पत्नीने देखील रेश्मा विरोधात तक्रार दिली होती.