Women Reservation Bill | ‘…म्हणून महिला आरक्षण बिल तातडीने आणलं’, ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Women Reservation Bill | महिला आरक्षण विधेयक लोकसभेत (Lok Sabha) काल (बुधवार) मंजुर करण्यात आलं. विधेकावरील चर्चे दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हे विधेयक त्वरित लागू करण्याची मागणी केली. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तर देताना वायनाड मतदारसंघ महिला आरक्षित झाला तर असं म्हणत टोला लगावला. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केला आहे. (Women Reservation Bill)

संजय राऊत म्हणाले, महिला आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेनेच्या भूमिकेवर आम्ही स्पष्टीकरण दिले आहे. महिलांना सरसकट 33 टक्के मतदारसंघ राखीव करण्यापेक्षा राजकीय पक्षांवर 33 टक्के महिला निवडून आणण्याची जबाबदारी टाकावी, बंधन टाकावं अशी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. राजधानी नवी दिल्लीत संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महिला आरक्षण संदर्भात भाष्य केलं. (Women Reservation Bill)

… म्हणून विधेयक घाईत आणलं

अमित शाह यांनी केलेल्या विधानावर बोलताना राऊत म्हणाले, अमित शाह चेष्टेने असं म्हणाले की, उद्या वायनाड मतदारसंघ महिला आरक्षित झाल्यावर तुम्ही आमच्यावर आरोप कराल. परंतु, ते काहीही करु शकतात. त्यांच्या हातात निवडणूक आयोग आहे. ते वायनाड मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित करु शकतात. अशा प्रकारे लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये बसलेले पुरुष नेते पुन्हा निवडून येऊ नयेत यासाठी हे विधेयक घाईत आणलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

…म्हणून पाठिंबा दिला

असे अनेक नेते आहेत जे विरोधी पक्षात आहेत किंवा भाजपमध्ये असतील, त्यांना या विधेयकामुळे सभागृहात येणं कठीण होईल. असं असलं तरी आम्ही सर्वांनी महिलांचा सन्मान, महिलांना अधिकार म्हणून आम्ही या विधेयकाला पाठिंबा दिला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं.

… त्यांना राजकीय आरक्षणाची गरज पडत नाही

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी फक्त राजकीय आरक्षण देऊन फायदा नाही तर मंत्रिमंडळात देखील
महिलांना आरक्षण हवं, अशी भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया विचारली असता राऊत म्हणाले,
त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल पण कर्तबगार महिला या सरपंचपदापासून ते संसदेपर्यंत आपल्या कर्तबगारीवर
निवडून येत असतात. त्यांना राजकीय आरक्षणाची गरज पडत नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणी काळभोर : पत्नीनं अंगावर पेट्रोल ओतून घेतलं, पतीनं चक्क तिला पेटवलं