सरकारी कार्यालयामध्ये Work From Home लागू, मान्य कराव्या लागतील ‘या’ अटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असून आता केंद्र सरकार सुद्धा पूर्ण अ‍ॅक्शनमध्ये दिसत आहे. अगोदरच देशातील कॉर्पोरेट सेक्टरच्या एका मोठ्या गटाने आपल्या कर्मचार्‍यांचे आरोग्य लक्षात घेऊन वर्क फ्रॉम होम ची सुविधा देण्यास सुरूवात केली आहे. आता केंद्र सरकार सुद्धा आपल्या कर्मचार्‍यांना ही सुविधा देत आहे. कोरोनाच्या दशहतीचे सावट असल्याने आता सरकारी कार्यालयांमध्येही वर्क फ्रॉम होम सुविधा लागू करण्यात येणार आहे. गुरुवारी कामगार मंत्रालयाने ही माहिती दिली.

50 टक्के कर्मचारी करू शकतील घरून काम
कामगार मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रुप-बी आणि ग्रुप-सी कर्मचार्‍यांना दोन भागात विभागण्यात आले आहे. यासोबतच निर्णय घेण्यात आला आहे की, 4 एप्रिलपर्यंत सरकारी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत 50 टक्के कर्मचारी आता घरातून काम करतील.

तयार होणार कर्मचार्‍यांचे रोस्टर
सरकारने आज जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, कर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळाही बदण्यात आल्या आहेत. सर्व विभागाचे प्रमुख आपल्या अंतर्गत येणार्‍या कर्मचार्‍यांचे एक रोस्टर तयार करतील. कर्मचारी एक आठवडा कार्यालयात आणि दुसर्‍या आठवड्यात घरातून काम करतील. कर्मचार्‍यांसाठी तीन टाईम स्लॉट बनवण्यात आले आहेत. जे याप्रकारे आहेत – 9 am – 5.30 pm, 9.30 am – 6 pm and 10 am – 6.30 pm.

4 एप्रिलपर्यंत जारी राहणार आदेश
घरून काम करणारे कर्मचारी फोन आणि इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे उपलब्ध राहतील. सोबतच हे देखील सांगण्यात आले आहे की, कोणत्याही आपत्कालीन स्थितीत कर्मचारी कार्यालयात येण्यासाठी तयार असतील. घरून काम करण्याचा आदेश 4 एप्रिलपर्यंत जारी राहील. यानंतर स्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल.

इमर्जन्सी सेवेतील कर्मचार्‍यांना ही सुविधा नाही
हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, हा आदेश त्या कार्यालयांसाठी आणि कर्मचार्‍यांसाठी लागू होणार नाही, जे इमर्जन्सी सेवेत येतात. विशेष करून जे थेट कोरोना व्हायरस बचावकार्यात काम करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like