‘पारले’तून 10 हजार कर्मचाऱ्यांना ‘नारळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘सच्ची शक्तीभरे’ असे ब्रीदवाक्य असलेल्या पारले बिस्कीट कंपनी १० हजार जणांना कामावरून कमी करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामागे मंदीचा फटका हे कारण असल्याने कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांना ‘नारळ’ देणार आहे. मंदीचा फटका बसल्याने एफएमसीजी क्षेत्राला फटका बसत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्टलेच्या उत्पादनांची विक्री कमी झाली आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या उत्पादनांची जून तिमाही दरम्यान मोठ्या प्रमाणात विक्री कमी झाली आहे. मॅगी नुडल्स आणि कॉफीची निर्मिती करणाऱ्या नेस्ले इंडियाने म्हटले, आमच्या उत्पादनांनी चांगली कामगिरी केल्याचा अभिमान आहे. असे असले तरी कमी मागणी आणि वस्तुंच्या वाढत्या किमतीच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

पारले प्राॅडक्ट्सचे कॅटगरी हेड मयांक शाह म्हणाले, जीएसटीत सवलत मिळाली नाही तर कंपनी किमान ८ हजार ते १० हजार जणांना कामावरून कमी करू शकते. ग्रामीण भागाचा कंपनीच्या बाजारपेठेत एक तृतीयांश हिस्सा आहे.

आरोग्यविषयक वृत्त –