वर्ल्डकप २०१९ : दुखापतच नाही तर ‘या’ गोष्टीमुळेही वाढली भारतीय संघाची ‘चिंता’

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ३६ धावांनी विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला.
मात्र त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करणारा शिखर धवन उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तीन आठवडे स्पर्धेतून आराम करणार आहे. आता भारत आपला पुढील सामना १३ जून रोजी न्यूझीलंडबरोबर तर १६ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर खेळणार आहे. मात्र न्यूझीलंडबरोबर होणाऱ्या संघाच्या चिंतेत भर पडली आहे. नॉटिंघम येथे पोहोचलेल्या भारतीय संघाला सतत पडणाऱ्या पाऊसामुळे सराव देखील करता आलेला नाही. दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत भारतीय संघाची सरावाची वेळ होती. मात्र सकाळपासूनच पडणाऱ्या पावसामुळे भारताचे हे सराव सत्र रद्द करण्यात आले.

दरम्यान, पाऊस हि एक मोठी चिंता सर्वच संघांसाठी ठरत आहे. याआधी देखील पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्याचबरोबर सोमवारी झालेला विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानांतर काळ झालेला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना देखील रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पाऊस न पाडण्याचीच प्रार्थना भारतीय संघ तसेच भारतीय पाठीराखे देखील करत असणार हे मात्र खरे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

Loading...
You might also like