World Cup 2019 : ‘या’ 5 सुंदर अँकर्स दिसणार अँकरींग करताना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- सर्वजण आतुरतेने वाट पहात असलेल्या वर्ल्ड कप 2019 केवळ 3 दिवस बाकी आहेत. तु्म्हाला सांगू इच्छितो की यावर्षीचा वर्ल्ड कप हा इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात अनेक मोठे खेळाडू आपल्या टॅलेंटचा जलवा दाखवताना दिसणार आहेत. यासोबतच यावेळी यात 5 सौंदर्यवतीही दिसणार आहेत. खरेतर या सौंदर्यवती अँकरींग करणार आहेत. क्रिकेटच्या या महाकुंभात त्याही आपला जलवा दाखवताना दिसणार आहेत. या सर्वात पहिलं नाव रिधिमा पाठकचं आहे.

या आहेत 5 सुंदर अँकर्स

1. रिधिमा पाठक- रिधिमा इंग्लडकडून हा क्रिकेट वर्ल्ड कप कव्हर करणार आहे. रिधिमा भारताची एकमेव फीमेल अँकर आहे जी क्रिकेटच्या आधी बास्केटबॉलचीही अँकर राहिली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, रिधिमा ही इंजिनियर आहे. रिधिमा आवाज दमदार असून ती एक व्हाईस ओव्हर आर्टिस्टदेखील आहे. यावेळी रिधिमा आयसीसी साठी वर्ल्ड कपमध्ये रिपोर्टींग करणार आहे. नुकताच तिने टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचाही इंटरव्ह्यू घेतला आहे.

2. मयंती लँगर- मयंती ही क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या महिला अँकर्सपैकी एक आहे. मयंती लँगर ही स्टार स्पोर्टसाठी इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप कवर करणार आहे. मयंती लँगरची भारतातही मोठी फॅन फॉलोविंग आहे.

https://www.instagram.com/p/Bx1TDjgBrLt/

3. पेया जन्नतुल- पेया बांग्लादेशाची ब्युटी क्वीन म्हणूनही ओळखली जाते. पेया बांग्लादेशातील टी 20 लीग्समध्ये अँकरींग करते. एवढेच नाही तर बांग्लादेशातील अनेक क्रिकेट स्टार्ससोबत अ‍ॅड . फिल्म्सही केल्या आहेत. जन्नतुल येत्या वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेश टीव्ही आणि गाजी टीव्हीसाठी मॅट कवर करणार आहे.

4. जैनब अब्बास- पाकिस्तानच्या जैनब अब्बासदेखील आयसीसी वर्ल्ड कप 2019 कवर करणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, जैनब पाकिस्तानातील प्रसिद्ध स्पोर्ट प्रेझेंटर आहे.

5. संजना गणेशन- स्टार नेटवर्कसाठी संजना गणेशनदेखील वर्ल्ड कपमध्ये रिपोर्टींग करणार आहे. संजना ही गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर आहे. यासोबतच तिने मॉडेलिंगमध्येही तिने तिचे नशीब आजमावले आहे.