जगावर आणखी एका संकटाचं सावट ! ‘कोरोना’मुळं वाढलाय ‘या’ गंभीर आजाराचा प्रादुर्भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूच्या विरोधात संपूर्ण जग दोन हात करत आहे. त्यातच आता एका अज्ञात न्यूमोनियांनं काही देशांची चिंता वाढवली आहे. कझाकस्तानमध्ये अज्ञात न्यूमोनियामुळे कोरोनाची प्रकरण वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे कझाकस्तानमधील सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा विश्वास आहे की, कझाकस्तानमधील अज्ञात न्यूमोनिया कोरोना विषाणुमुळे होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले की, त्यांचा असा विश्वास आहे की कोरोना विषाणूमुळे कझाकस्तानमध्ये अज्ञात न्यूमोनियाचा प्रादुर्भाव वाढला आहे. डॉ. मायकेल रायन यांनी सांगितले की, तेथील अधिकारी व संस्थांनी गेल्या आठवड्यात 10 हजार नवीन कोरोना प्रकरणांची नोंद केली आहे.

सध्या कझाकस्तानमध्ये 50 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 264 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. रायन म्हणाले, न्यूमोनियाच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये कोरोना होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कोणतेही निदान झालेले नाही. डॉक्टर नायर यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांसह तपासणीचा आढावा घेतला आहे. यावेळी न्यूमोनियाच्या घटनांचे नमुने कोविड-19 शी सुसंगत आहे का ? याची पाहणी केली.