World Heart Day 2021 | जास्त घाम, पायांमध्ये सूज, हृदय विकाराच्या झटक्याचे ‘हे’ 9 संकेत; जाणून घ्या

नवी दिल्ली : World Heart Day 2021 | हृदरोगांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे साजरा केला जातो. यानिमित्त हृदयरोगाच्या 9 प्रमुख लक्षणांबाबत (Heart disease symptoms) जाणून घेवूयात. (World Heart Day 2021)

1. छातीत वेदना – Chest pain
अनेकदा आई-वडील आणि तुम्ही सुद्धा छातीमधील वेदनांकडे गॅस किंवा अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करता. तुमच्या पालकांना छातीत वेदना किंवा दबाव जाणवला तर हा हृदयविकाराचा झटका येण्याचा संकेत (sign of a heart attack) असू शकतो.

याशिवाय, आर्टरीमध्ये ब्लॉकेज असल्यास सुद्धा छातीत वेदना होऊ शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. असे खुप कमी प्रकरणात होते की छातीत वेदना न होताच हार्ट अटॅक येतो.

2. घशात-जबड्यात वेदना – Throat-jaw pain

जर तुम्हाला किंवा आई-वडीलांना छातीत वेदना होऊ लागल्या, ज्या घसा आणि जबड्यापर्यंत पसरल्या तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.

3. खुप जास्त घाम – Excessive sweating

कोणतेही वर्कआऊट आणि काम न करता जास्त घाम येणे हृदयविकाराचा संकेत असू शकतो. जेव्हा हृदय रक्त व्यवस्थित पम्प करण्यास असमर्थ ठरते तेव्हा कोणत्याही कारणाशिवाय खुप जास्त घाम येतो. जर हे लक्षण दिसून आले तर दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4. चक्कर येणे – Dizziness

चक्कर आणि डोळ्यासमोर अंधार पसरल्यास लो ब्लड प्रेशरची समस्या असू शकते. जर कुणामध्ये हे लक्षण दिसत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. लो ब्लड प्रेशरमध्ये शरीरात ब्लड फ्लो कमी होतो. यामुळे रक्त प्रवाह हृदयापर्यंत पोहचत नाही आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

5. उलटी, मळमळ आणि गॅस – Vomiting, nausea and gas

मळमळीनंतर उलटीसारखे वाटणे हे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याचे सुरूवातीचे लक्षण असू शकते. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

6. पायांना सूज – Swelling of the feet

पायांना, टाचांना सूज आणि तळव्यांना सूज येण्याचे कारण हृदयाच्या आजाराशी संबंधीत असू शकते.
अनेकदा हार्टमध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित न झाल्याने पाय, टाचांमध्ये सूज आणि तळव्यांमध्ये सूज येते.

7. हाय ब्लड प्रेशर – High blood pressure  

हाय ब्लड प्रेशर असेल तर नियमित तपासणी करत राहा. अनियंत्रित उच्च रक्तदाब हृदयाला कठिण बनवू शकतो.
ज्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

8. हाय ब्लड शुगर – High blood sugar

हाय ब्लड शुगरमुळे कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका वाढतो. ब्लडमध्ये शुगरची लेव्हल वाढल्याने कोरोनरी धमण्या अरूंद होतात. यामुळे रक्तवाहिन्यांच्या फंक्शनमध्ये अडथळा येतो. यासाठी वेळोवेळी ब्लड शुगर लेव्हल तपासा.

9. हाय कोलेस्ट्रॉल – High Cholesterol

कोलेस्ट्रॉल शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये आढळणार्‍या चरबीसारखा पदार्थ आहे.
तो जास्त प्रमाणात तयार झाल्यास रक्तात कोलेस्ट्रोल वाढवते आणि वाहिन्यांमध्ये जमा होते.
यामुळे धमण्या अरूंद होतात आणि कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हृदयरोगाचा धोका वाढतो.
नियमितपणे कोलेस्ट्रॉलची लेव्हल तपासा.
डाएटमध्ये धान्य, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. (World Heart Day 2021)

हे देखील वाचा

Pune ACP Transfer | बारामतीहून आयुक्तालयात हजर झालेले ACP नारायण शिरगांवकर यांची पुणे शहरात ‘या’ ठिकाणी नियुक्ती

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,029 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  World Heart Day 2021 | world heart day 2021 9 important symptoms of heart disease heart attack

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update