World Hypertension Day 2021 : आहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – आजकालची लाईफस्टाईल पाहता हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाबाची समस्या सर्वसामान्य बाब आहे. त्याला हायपरटेन्शनही म्हटले जाते. हाय ब्लड प्रेशरची समस्या प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये दिसू शकते. भारतात वयापूर्वी मृत्यू होणाऱ्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असल्याचे मोठे कारण आहे. हा आजार घातकही ठरू शकतो. रक्तदाब नियंत्रित करणारे अनेक लोक औषधांचा वापर करत असतात.

पालेभाजीमध्ये फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि इतर पोषक तत्व आहेत. दररोज पालेभाज्यांचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते. ते एनर्जेटिक बनण्यासाठी मदत करतो. हे उच्च रक्तदाब आणि इतर ह्रदयासंबंधी आजाराला धोकादायक बनण्यापासून दूर ठेवते. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडला ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. शरीरात त्याच्या पूर्तीसाठी सेलमन माशापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. हा फॅट शरीरात जाऊन फक्त ब्लड प्रेशरला नियंत्रित करतो तर रक्तातील पेशींसाठी आणि सूजेवर प्रभाव टाकतो.

लिंबू, संत्रे, द्राक्षे यांसारखे पदार्थ रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायद्याचे आहेत. अनेकप्रकारे व्हिटॅमिन आणि मिनरलने भरपूर हे फळ ह्रदयरोगाचा धोका कमी होऊ शकते. अभ्यासानुसार, संत्रे आणि द्राक्षाचा रस प्यायल्याने अनियंत्रित ब्लड प्रेशरचा धोका टाळता येऊ शकतो.

कोबीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, अमिनो अ‍ॅसिड हे सर्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कोबीच्या बियांनी बनलेले औषधीय तेल हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. शोधानुसार, याच्या तेलाच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशरच्या समस्यापासून वाचता येऊ शकते.

फ्लॉवरमध्ये सल्फोराफेन असते, ते ह्रदयासंबंधी आजारांचा धोका कमी करतो. रिसर्चनुसार, सल्फोराफेन हाय ब्लड प्रेशरलाही कमी करतो. धमन्या स्वस्थ ठेवण्यासाठी मदत करतो.

बेरीमध्ये अंथोसियानिन नावाचा अँटी ऑक्सिडेंट आढळतो. हा उच्च रक्तदाबसारखा गंभीर रोगापासून शरीराचा बचाव करतो. अंथोसियानिनमध्ये आढळणाऱ्या नायट्रिक ऑक्साइड रक्त वाहिकांमध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या अणूंचे उत्पादन कमी करू शकते. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते.

ब्रॉकलीमध्ये अँटी-ऑक्सि़डेंट हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी करू शकतो. हेल्थ एक्सपर्टनुसार, डायटमध्ये ब्रॉकलीचा समावेश केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या कमी होऊ शकते. ब्रॉकली खाल्याने ब्लड प्रेशरची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते. पिस्तामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, पोटॅशियम, आयरन, कॅल्शियम आणि अनेक पोषकतत्व आढळते. याचे नियमित सेवन केल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो.

पालकमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्निशियम आणि नायट्रेट्स आरोग्यासाठी लाभकाही आहे. दररोज पालक खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो. पालकमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के आणि आयर्न असतो. त्यांना ह्रदयासंबंधी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

डाळीत पोषक तत्व असते. रक्ताचा प्रवाह चांगल्या पद्धतीने रेग्युलेट करण्यासाठी मदत करतो. यामध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असल्याने ह्रदयसंबंधी आरोग्य चांगले राहते.