‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  तुम्हाला जास्त डास चावतात का ? जर असे असेल तर या मागेही कारण आहे हे लक्षात ठेवा. याच बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत की, जर एखाद्याला जास्त डास चावत असतील तर याचे नेमके काय कारण आहे.

1) रक्त – जर तुमचं रक्त गोड असेल तर तुम्हाला डास जास्त चावतात असे म्हटले जाते. अनेक वडिलधारी मंडळी असे म्हणताना तुम्ही ऐकले असेल. याचे कारण हे आहे की, डास ओ ब्लड ग्रुपकडे जास्त आकर्षित होतात. यामध्ये काही खास तत्व असतात. त्यामुळे डास जास्त खेचले जातात.

2) लॅक्टीक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असणे – आपल्या त्वचेत लॅक्टीक अ‍ॅसिड असतं. याचे प्रमाण जर जास्त असेल तर डास जास्त चावतात.

3) व्यायामानंतर – शरीराचे तापमान हेदेखील डास चावण्याचे एक कारण आहे. व्यायाम करताना शरीराचं तापमान जास्त असतं. त्यामुळे यानंतर डास चावतात.

4) दीर्घ श्वास – जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा आपण सोडलेल्या कार्बन डायऑक्साईडमुळेही डास तुमच्याकडे ओढले जातात. कारण यात आपल्या शरीराचा गंध असतो.

5) प्रेग्नंसी – प्रेग्नंट महिलांच्या शरीराचे तापमान सामान्य महिलांपेक्षा जास्त असते. हेच कारण आहे की, त्यांना डास जास्त चावतात.

6) 3000 अधिक जाती – American Mosquito Control Association नुसार, जगात डासांच्या 3 हजारांहून अधिक जाती आहेत. यात काही तर इतके खतरनाक आहेत की, त्यांच्या चावण्याने मृत्यूही होऊ शकतो.

7) मादा डास – ही एक फॅक्ट आहे की, नर डास चावत नाही तर मादा डास चावते. आपल्या शरीरातील रक्तामुळे मादा डासाचे अंडे लवकर बनतात. डासांची संख्या वाढवण्यातही मानवी रक्ताची कमाल आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like