World No Tobacco Day : कॅन्सरच नव्हे, तंबाखू खाण्याने होतात इतरही जीवघेणे आजार

नवी दिल्ली : आज 31 मे रोजी जगभरात वर्ल्ड नो टोबॅको डे (World No Tobacco Day)  साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा हेतू तंबाखूने होणार्‍या घातक आजारांबाबत जागरुकता करणे आहे. ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबेको सर्वे (World No Tobacco Day) (गॅट्स) 2009-10 अनुसार, सुमारे 35 टक्के भारतीय कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखूचा वापर करतात. यामध्ये 47 टक्के पुरुष आणि 20.2 टक्के महिला आहेत. तंबाखू शरीरासाठी किती जीवघेणी आहे ते जाणून घेवूयात…

तंबाखूमुळे आरोग्याचे नुकसान –
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तंबाखूमुळे दात कमजोर होतात आणि वेळेपूर्वीच पडतात. याच्या सेवनाने दात-तोंडाशी संबंधीत आजार होऊ लागतात. याशिवाय, डोळ्यांची दृष्टी सुद्धा कमी होऊ लागते. तंबाखू फुफ्फुसासाठी खुप धोकादायक आहे.

तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता
तंबाखूमधील निकोटीन ब्लड प्रेशर सुद्धा वाढवते. जेव्हा तुम्ही धूम्रपान करता तेव्हा त्याचा धुर संपूर्ण श्वसनतंत्राला प्रभावित करतो. तो डोळे, कान आणि फुफ्फुसांना प्रभावित करतो. याचा थेट संबंध तोंडाशी असतो यासाठी जास्त तंबाखू खाणार्‍यांना तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

वेळीच लक्ष द्या
तंबाखू खाणारे बहुतांश लोक आपले तोंड उघडू शकत नाही. तोंडात दोन्हीकडे सफेद लाईन कॅन्सरकडे जाण्याचा संकेत आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर हे धोकायदायक होऊ शकते.

मेंदूवर होतो परिणाम
तंबाखूच्या सेवनाने व्यक्तीला निकोटीनची सवय होते आणि याचा परिणाम मेंदूवर होतो. तंबाखू खाणार्‍या व्यक्तीला ती खाल्ल्याने एक प्रकारची डोक्याची शांतता मिळते आणि तो याच्या आहारी जातो. अशा लोकांना जेव्हा तंबाखू मिळत नाही तेव्हा तो बेचैन आणि अस्वस्थ होतो.

महिलांना मोठा धोका
एका रिपोर्टनुसार, तंबाखू सेवन करणार्‍या महिलांमध्ये गर्भपाताचा दर समान्य महिलांच्या तुलनेत सुमारे 15 टक्के जास्त असतो. तंबाखू सेवनामुळे महिलांना फुफ्फुसाचा कॅन्सर, हृदय विकाराचा झटका, श्वासाचे आजार, प्रजनन संबंधी आजार, निमोनिया, मासिक पाळीशी संबंधीत समस्या जास्त होतात.

जीवघेणी तंबाखू टाळा
यासाठी महिलांसह पुरुषांनी सुद्धा तंबाखू सेवन टाळले पाहिजेत. तंबाखूच्या सेवनाने गंभीर आजार होत असल्याने ती जीवघेणी ठरत आहे. जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाने निर्माण झालेल्या समस्यांमुळे होत असल्याचे दिसून आले आहे.

 

Also Read This : 

 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

 

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

 

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

 

 

कोविड-19 आणि ब्लॅक फंगस संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो का? जाणून घ्या

 

‘टारझन’ स्टार जो लारा याचा विमान अपघातात मृत्यु; मृतांमध्ये पत्नीसह 7 जणांचा समावेश

दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या