World Obesity Day | वजन कमी करायचे आहे तर चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, खाल्ल्यास वाढू शकतो लठ्ठपणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जागतिक लठ्ठपणा दिन (World Obesity Day) दरवर्षी 4 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी लठ्ठपणाबद्दल (Obesity) जागरुकतेसाठी अनेक कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात, जेणेकरून लोकांना लठ्ठपणाबद्दल सविस्तर माहिती मिळावी आणि त्यानंतर लठ्ठपणा कमी करण्यासाठी परिश्रम घेतले जावेत. (World Obesity Day)

 

WHO च्या मते, जगभरातील सुमारे 39 टक्के तरुणांचे वजन जास्त आहे. ते वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहारासोबत बाजारात उपलब्ध अनेक प्रकारचे फॅट फ्री फूड (Fat Free Food), लो कॅलरी फूड (Low Calorie Food) , लो फॅट फूड (Low Fat Food), लो कार्ब फूड (Low Carb Food) देखील घेतात.

 

जे लोक अशा फूडचे सेवन करतात, त्यांना सांगावेसे वाटते की असे अन्न खाल्ल्यानंतरही वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. कारण अशा उत्पादनांवर या ओळी केवळ ते विकण्यासाठी लिहिल्या जातात. उदाहरणार्थ, बाजारात मिळणार्‍या काही गोष्टी, ज्या आरोग्यदायी म्हणून खाल्ल्या जातात, त्यात साखर (Sugar), चॉकलेट (Chocolate), प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले असते, ज्यामुळे वजन वाढू (Weight Gain) शकते. (World Obesity Day)

 

अशा पदार्थांचे रोज सेवन केल्यास वजन वाढते. म्हणूनच येथे अशा काही गोष्टींबद्दल ज्यांना ज्यांना हेल्दी म्हटले जाते, पण त्यांच्यामुळे चरबी किंवा वजन वाढते.

 

1. लो फॅट फ्लेवर्ड दही (Low-Fat Flavored Yogurt)
दही वजन कमी करण्यास मदत करते. पण ते दही साधे असले पाहिजे, कारण त्यात प्रोटीन जास्त प्रमाणात आढळतात, पण वजन कमी करण्यासाठी बाजारात मिळणारे फ्लेवर्ड दही खाल्ले तर ते उलटे काम करू शकते.

 

संशोधनांनी असे म्हटले आहे की कमी चरबीयुक्त दहीमध्ये अतिरिक्त साखर मिसळली जाते, ज्यामुळे वजन वाढू शकते. एका अभ्यासानुसार, 1 कप (225 ग्रॅम) फ्लेवर्ड दहीमध्ये 7 चमचे म्हणजेच 29 ग्रॅम साखर आढळून आली होती. त्यामुळे त्याचे सेवन टाळा.

2. स्मूदी आणि प्रोटीन शेक (Smoothies And Protein Shakes)
बाजारात मिळणार्‍या आर्टिफिशियल स्मूदी आणि प्रोटीन शेकला मार्केटिंग जगतात खूप प्रसिद्धी मिळाली आहे. यामुळे लोक घरी बनवलेल्या नैसर्गिक स्मूदी पिण्याऐवजी पॅकेज केलेली स्मूदी आणि बाजारात उपलब्ध असलेले प्रोटीन शेक पितात. अभ्यासानुसार, तयार स्मूदीच्या 1 बाटलीत (450 मिली) सुमारे 14 चमचे म्हणजेच 55 ग्रॅम साखर आढळून आली.

 

याशिवाय, इतर अभ्यासांमध्ये तयार प्रोटीन शेकमध्ये सुमारे 400 कॅलरीज आढळल्या. त्यामुळे रेडीमेड स्मूदी किंवा शेकचे सेवन कधीही करू नये, अन्यथा वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.

 

3. नारळ पाणी (Coconut Water)
नारळ पाणी हे जगभरातील अतिशय लोकप्रिय पेय आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पण बाजारात मिळणारे पॅकेज नारळाचे पाणी प्यायल्यास, त्यात साखर मिसळेली असते. ज्यामुळे ते अनहेल्दी ठरते. त्यामुळे नेहमी नैसर्गिक नारळाच्या पाण्याचेच सेवन करा.

 

4. पॅकेज्ड ज्यूस (Packaged Juice)
बाजारात जे पॅकेज्ड ज्यूस मिळतात त्यावर ’नॅचरल ज्यूस’ असे मोठ्या अक्षरात लिहिलेले असते. हा शब्द वाचूनच प्रत्येकजण ते विकत घेतो.
आपण असे गृहीत धरू शकतो की त्यामध्ये असलेले ज्यूस नैसर्गिक आहे.

 

परंतु प्रिझर्व्हेटिव्हज, गोडपणासाठी साखर आणि फ्लेवर्स देखील जास्त काळ वापरण्यासाठी घातलेले जातात,
ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वजन वाढू शकते. यासोबतच त्यांच्या सेवनामुळे भरपूर कॅलरीज शरीरात जातात, जे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे.

 

5. प्रोटीन बार (Protein Bar)
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रोटीन बारचे सेवन करतात.
या प्रोटीन बारमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात. ते दीर्घकाळ वापरता येण्यासाठी काही प्रिझर्वेटिव्ह देखील टाकले जातात.
उदाहरणार्थ, सुमारे 6 चमचे म्हणजे 24 ग्रॅम साखर एका प्रोटीन बारमध्ये आढळते. त्यामुळे प्रोटीन बारचे सेवन देखील टाळा.

6. ग्रॅनोला (Granola)
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी ग्रॅनोलाचे सेवन करतात. कदाचित तुम्हीही करत असाल.
परंतु तुम्हाला हे लक्षात घ्या की ओट्स, नट, बियांसह ग्रॅनोलामध्ये देखील भरपूर साखर असते. त्यामध्ये टाकलेली साखर ग्रॅनोलाला अनहेल्दी करते.

 

त्यामुळे बाजारात मिळणार्‍या ग्रॅनोलाऐवजी घरी बनवलेले ग्रॅनोला खा.
घरी ग्रॅनोला बनवण्यासाठी ओट्स, दालचिनी पावडर, नारळ, खोबरेल तेल, नट, सीड्स वापरा.

 

7. शुगर फ्री बिस्किट (Sugar Free Biscuit)
शुगर फ्री, नो अ‍ॅडेड शुगर अशी नावे देऊन शुगर फ्री बिस्किटांची बाजारात जाहिरात केली जाते,
मात्र या बिस्किटांमध्ये मैदा आणि पामतेल असते, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते.

 

यासोबतच त्यात फॅट आणि मिठाचे प्रमाण खूप जास्त असते.
फॅटच्या अतिसेवनामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते, त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- World Obesity Day | world obesity day 2022 foods that make you gain fat or weight diet soda protein bars low calorie juice flavored yogurt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | सिंहगड रोडवरील सराईत टोळीतील 14 जणांवर ‘मोक्का’ कारवाई ! आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 69 टोळ्यावंर MCOCA अ‍ॅक्शन

 

Disproportionate Assets-Crime News | काय सांगता ! होय, महिन्याला 5 हजार कमावणारा पालिका कर्मचारी 238 कोटींचा मालक; जाणून घ्या प्रकरण

 

SARTHI Pune | मराठा, कुणबी, कुणबी – मराठा व मराठा – कुणबी”या समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या भविष्यकालीन योजनांसाठी लेखी सूचना पाठविण्याचे सारथीचे आवाहन