Pulses : प्रोटीनच नव्हे, हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक आहेत डाळी, जाणून घ्या ‘हे’ 12 फायदे

पोलिसनामा ऑनलाईन – डाळीतील पोषकतत्व आणि तिचे महत्व समजून घेतले पाहिजे. बदलत्या लाईफस्टाईलमध्ये लोकांमध्ये फास्टफूडचे प्रमाण वाढत आहे आणि लोक डाळ कमी सेवन करत आहेत. प्रत्येक डाळीत अनेक पोषकतत्व असतात. तूरडाळ, चना, मसूर, राजमा, मटर, आणि उडीदसारख्या अनेक डाळी आहेत. डाळीत भरपूर फायबर, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, झिंक आणि पोटॅशियम आढळते. ही सर्व पोषकतत्व शरीरासाठी आवश्यक आहेत.

डाळ खाण्याचे फायदे :
1 डाळीत खुप कमी फॅट असते.
2 डाळ खनिज, व्हिटॅमिन, अँटी-ऑक्सीडेंटयुक्त असते.
3 पचनक्रियेत उपयुक्त फायबर्स डाळीत असते.
4 खुपवेळपर्यंत पोट भरलेले राहते, यामुळे वजन वाढत नाही.
5 नियमित सेवन केल्याने बॉडी अ‍ॅक्टिव्ह राहते.
6 प्रोटीनसह आयर्नची गरज पूर्ण करते.
7 डाळीत कॅन्सरपासून बचाव करणारी तत्व आढळतात.
8 डाळीत कोलेस्ट्रॉल आढळत नाही.
9 डाएट्री फायबर्स असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही.
10 नियमित खाल्ल्याने हृदयरोगांचा धोका कमी होतो.
11 पोट चांगले राहते.
12 यातील आयर्न, मॅग्नेशियम आणि झिंकमुळे संसर्गजन्य आजार दूर राहतात.

अशी बनवा डाळ
डाळ बनवण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या. भांड्यात डाळीसह पाणी आणि मीठ टाकून मंद आचेवर 15-20 मिनिटांपर्यंत उकळवा. चवीनुसार यामध्ये थोडे पाणी टाकून तडका द्या.