World Weightlifting Championship | मनगटाच्या दुखापतीवर मात करत मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई

पोलीसनामा ऑनलाईन : World Weightlifting Championship | भारताची ऑलिम्पिक पदकविजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) बुधवारी जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे जागतिक स्पर्धेत सहभागी होताना मीराबाईचे मनगट दुखावले होते. मात्र, मीराबाईने त्यावर मात करत एकूण 200 किलोचे वजन उचलून स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेमध्ये मीराबाई चानू यांनी 49 किलो वजनी गटात सहभाग नोंदवला होता. तिने या स्पर्धेत स्नॅचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 113 किलो असे एकूण 200 किलो वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत चीनच्या जिआंग हुईहुआने 206 किलो (93 व 113) वजन उचलून सुवर्णपदक पटकावले, तर चीनच्याच होऊ झीहुआने 198 किलो (89 व 109 किलो) वजन उचलत कांस्यपदक जिंकले. (World Weightlifting Championship)

मीराबाईने 2017 च्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. यावेळीदेखील तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती मात्र, सप्टेंबर महिन्यात सरावादरम्यान मीराबाईचे मनगट दुखावले होते. याच दुखापतीसह ती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यामुळे तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. मात्र, तिने माघार न घेता आपल्या मनगटाच्या दुखण्यावर मात करत तिने रौप्यपदकाची कमाई केली आहे. (World Weightlifting Championship)

जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाईचे हे दुसरे पदक ठरले. यापूर्वी 2017 मध्ये अ‍ॅनाहाइम,
अमेरिका येथे झालेल्या स्पर्धेत मीराबाईने सुवर्णपदक पटकावले होते.
या स्पर्धेनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा म्हणाले की ‘‘आम्हाला या स्पर्धेचे दडपण नव्हते.
इतके वजन मीराबाई कायम उचलते. आता आगामी स्पर्धामध्ये आम्ही अधिक वजन उचलण्यास सुरुवात करू,’’.

Web Title :- World Weightlifting Championship | weightlifting championship mirabai chanu wins silver despite wrist injury

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक