बिहारमध्ये उंदरांचा नवीन ’कारनामा’, दारू आणि धरणानंतर आता X-Ray मशीनला केले टार्गेट, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

जहानाबाद : वृत्तसंस्था – X-Ray | बिहारमध्ये उंदरांनी दारू पिऊन धरणे फोडल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या आणि ऐकल्या असतील. पण आता उंदरांशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे, जे आणखीनच आश्चर्यकारक आहे. राज्यातील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदुमपूर येथील सुखदेव प्रसाद वर्मा रेफरल हॉस्पिटलमध्ये उंदीर आणि मुंग्यांनी मिळून नवीन डिजिटल एक्स-रे मशीन खाऊन टाकले आहे. लाखोंचे मशीन सुरू होण्यापूर्वीच उंदीर आणि मुंग्यांनी हे कृत्य केले आहे. (X-Ray)

 

संपूर्ण प्रकरणाचा खुलासा
मखदुमपूरचे राजद आमदार सतीश कुमार यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. आमदारांनी सरकारवर टीका करत उपरोधाने म्हटले की, मी सरकारकडे उंदीर आणि मुंग्यांना अटक करण्याची मागणी करणार आहे.

 

तत्पूर्वी आमदारांनी रुग्णालयाची पाहणी केली होती. यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की 22 लाख रुपये किमतीचे डिजिटल एक्स-रे मशीन, जे 15 ऑगस्ट रोजी कार्यान्वित होणार होते, ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही.

चौकशी केल्यावर समजले की, उंदीर आणि मुंग्यांनी मिळून ते खाल्ले. मशिन मुंग्या आणि उंदरांनी खाल्ल्याचे डॉक्टरांनी आमदारांना सांगितले. हैदराबाद येथून दुसरे मशीनची मागवण्यात आले आहे. मशिन आल्यानंतर रुग्णांना रुग्णालयात एक्स-रेची सुविधा मिळू शकते. (X-Ray)

 

हे ऐकून आमदार भडकले.
हे ऐकून आमदार सतीश दास संतापले आणि त्यांनी मशिनचा पुरवठा करणार्‍या ठेकेदाराला फोन केला. ठेकेदाराने आमदारांना सांगितले की, मशिनमध्ये बिघाड आहे, त्याची चूक नाही, योग्य मशीन दिली आहे. या प्रकरणात एक्स-रे मशीन खाणारे उंदीर आणि मुंग्यांचा दोष आहे.

 

या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी आमदारांनी आरोग्यमंत्री मंगल पांडे यांच्याकडे केली आहे.
तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

 

काय म्हणाले, सिव्हिल सर्जन
या संदर्भात जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. अशोककुमार चौधरी यांनी हा पूर्णत: ठेकेदाराचा निष्काळजीपणा असल्याचे सांगितले.
लॉकडाऊनच्या वेळी त्यांनी एक्स-रे रूममध्ये मशीन दिले आणि त्याच दरम्यान पाऊसही पडला, त्यामुळे मशीनला मुंग्या लागल्या.

 

संपूर्ण जबाबदारी कंत्राटदाराची असून तोच ते दुरुस्त करेल. यामध्ये सरकारचे कोणतेही नुकसान नाही.
मात्र, मशिन ठीक होणार की नवीन मशीन येणार, हा नंतरचा विषय आहे.
मात्र या घटनेने आरोग्य विभागाच्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.

 

Web Title :- X-Ray | x ray machine worth lakhs destroyed by rats and ant in one hospital of jehanabad bihar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 51 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | तडीपार सराईत गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखा युनिट-1 कडून अटक

Pune Corona | पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्या शंभरच्यावर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 149 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी