Xiaomi चा Mi Band 4 लॉंच, फक्त 1 हजार 700 रुपये किंमत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Xiaomi mi Band 4 ला एका इवेंटमध्ये लॉन्च केला आहे. या नव्या वर्जनमध्ये 2.5 D कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन बरोबरच कलर्ड AMOLED हे पॅनल देण्यात आले आहे. AMOLED डीस्प्ले असल्याने यात वॉच फेसचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात 6 नवे एक्सिस एक्सीलेरोमीटर सेंसर देण्यात आले आहेत. जे हालचालींना टीपू शकतील. याच बरोबर यात पेमेंट सपोर्ट देखील देण्यात आले आहे.

याची किंमत चीनमध्ये स्टॅडर्ड एडिशनसाठी CNY 169 म्हणजेच 1 हजार 700 रुपये असणार आहे. तसेच NFC वेरिएंटची किंमत CNY 229 म्हणजेच लगभग 2 हजार 300 ठेवण्यात आली आहे . तसेच यात Avengers ची लिमिटेड एडीशन काढण्यात आली आहे. ज्यात 3 वेगवेगळे बँड्स, मार्वल सुपरहीरो वॉच फेस आणि एक स्पेशल पँकेज CNY 349 म्हणजेच 3 हजार 500 रुपये ठेवण्यात आले आहे. असे असले तरी कंपनीने अजून आंतरराष्ट्रीय किंमत आणि उपलब्ध कधी होणार या बाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इंटीग्रेटेड पेमेंट मोड –

MI BAND 4 मध्ये 2.5D ग्लास प्रोटेक्शन आणि 120 बाय 240 चा पिक्सल रिजोल्यूशन बरोबरच 0.95 इंचचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. यात टच इनपुटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात बिल्ट इन मायक्रोफोन देण्यात आला आहे. ज्यात वॉईस कमांडचा सपोर्ट देण्यात आला होता.

शाओमीने यात पेमेंट मोड ला इंटीग्रेटेड केले आहे, यामुळे युजर्स पेंमेट करु शकतील, तसेच हा डिस्प्ले फोन सर्च करण्यासाठी आणि टॅपने म्युझिक स्विच ऑफ ऑन करण्यासाठी मदत करेल. तसेच हवामानाचा आणि शेअर मार्केटची माहिती देखील देईल.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका 

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

 रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’