येरवडयाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी युनुस शेख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदी बढत्या देण्यात आल्या. पुणे शहरातील काही पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना देखील सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळाली. त्यामुळे शहरातील काही पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे पद रिक्त झाले होते. आज येरवडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी युनुस इस्माईल शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

युनुस शेख हे गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांची आता येरवडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश पुणे शहर पोलिस दलाचे सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like