Yashwant Jadhav IT Raid | ‘मातोश्री’ला 2 कोटी अन् 50 लाखांचं घड्याळ, यशवंत जाधवांच्या डायरीतील ‘मातोश्री’ म्हणजे नेमकं कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Yashwant Jadhav IT Raid | मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे (BMC Standing Committee Chairman) अध्यक्ष आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह कंत्राटदारांवर 25 फेब्रुवारीला प्राप्तिकर विभागाने छापे (Income Tax Department) टाकले होते. या छाप्यांमध्ये प्राप्तिकर विभागाला मोठी माहिती मिळाली आहे. जाधव यांची एक डायरी प्राप्तिकर विभागाला सापडली आहे. या डायरीमध्ये कोट्यावधींच्या संशयित व्यवहारांची नोंद आहे. ‘मातोश्री’ला दोन कोटी दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या डायरीतील ‘मातोश्री’ (Matoshri) म्हणजे ‘आई’, असं स्पष्टीकरण यशवंत जाधव यांनी दिलं असल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. (Yashwant Jadhav IT Raid)

 

यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या व्यवहाराच्या नोंदी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये मातोश्रीला दोन कोटी दिल्याचा उल्लेख असल्याचे सूत्रांनी दिली. याशिवाय मातोश्रीला 50 लाखांचे घड्याळ दिल्याचाही उल्लेख डायरीत आहे. परंतु डायरीमध्ये ज्या मातोश्रीचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या आपल्या आई असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. आता आयकर विभागाकडून या संदर्भात तपास सुरु आहे. आयकर विभागाने जाधव यांच्या घरी छापा टाकून दस्तऐवज जप्त केला आहे. तसेच विमल अग्रवाल (Vimal Agarwal) यांच्या घरीही छापेमारी केली होती. (Yashwant Jadhav IT Raid )

 

गरजूंना 2 कोटींच्या वस्तूंचे वाटप केले
यावर बोलताना यशवंत जाधव म्हणाले, पहिल्या नोंदीमध्ये 50 लाखांच्या घड्याळांचे त्यांनी आईच्या वाढदिवसानिमित्त वाटप केले होते.
याशिवाय आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी गुढीपाडव्याला गरजूंना दोन कोटी रुपयांच्या वस्तू वाटप केल्याचं सांगितलं.
या भेटवस्तू वाटपासाठी आपण मातोश्री लिहिल्याचे सांगितले आणि त्यांच्यासमोर दोन कोटी रुपयांची नोंद करण्यात आली.
25 फेब्रुवारीला प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ही डायरी सापडली होती.
यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव (MLA Yamini Jadhav)
या भायखळा विधानसभा मतदारसंघातून (Byculla Assembly constituency) आमदार आहेत.

सोमय्यांचे जाधव यांच्यावर केले होते आरोप
आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने केलेली ही कारवाई शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
मुंबईतील कोविड सेंटर (Covid Center) उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला.
तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering Case) केल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला होता.

 

Web Title :- Yashwant Jadhav IT Raid | Shivsena leader and BMC Standing Committee Chairman yashwant jadhav gave 2 crore to matroshree uddhav thackeray it raid reveals

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा