Chandrakant Patil | ‘संजय राऊतांनी माझी केलेली सगळी चेष्टा अंगावर येणार’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते (Shivsena) आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष (BMC Standing Committee Chairman) यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या चौकशीत प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकाऱ्यांना एक डायरी सापडली असून त्यात संशयास्पद व्यवहार समोर आले आहे. या प्रकरणावरुन भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संजय राऊतांचा (Sanjay Raut) उल्लेख करुन प्रतिक्रिया दिली आहे. अशी डायरी सापडली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही. पण मला एवढंच दिसत आहे की खूप काही तरी होणार आहे. वारंवार संजय राऊत यांच्याकडून माझी चेष्टा केली जाते. पण सगळी चेष्टा अंगावर येणार आहे कारण मी जे म्हणत आहे ते सगळं खरे ठरत चाललं आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे.

 

अधिकाऱ्यांना सापडलेल्या या डायरीत (Diary) दोन व्यवहार आढळून आल्याने संशय निर्माण झाल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. ‘मातोश्री’ला 50 लाख रुपयांचे घड्याळ (Clock) आणि दोन कोटी रुपयांचे आणखी एक गिफ्ट दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. परंतु शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी ते चुकीचे ठरवत डायरीत आईसाठी लिहिल्याचे सांगितले आहे. यावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या इशाऱ्याला संजय राऊत कसे उत्तर देतात हे पहावे लागेल.

यशवंत जाधव यांचे स्पष्टीकरण
यावर बोलताना यशवंत जाधव म्हणाले, पहिल्या नोंदीमध्ये 50 लाखांच्या घड्याळांचे त्यांनी आईच्या वाढदिवसानिमित्त वाटप केले होते.
याशिवाय आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी गुढीपाडव्याला गरजूंना दोन कोटी रुपयांच्या वस्तू वाटप केल्याचं सांगितलं.
या भेटवस्तू वाटपासाठी आपण मातोश्री लिहिल्याचे सांगितले आणि त्यांच्यासमोर दोन कोटी रुपयांची नोंद करण्यात आली.
25 फेब्रुवारीला प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ही डायरी सापडली होती.
यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव (MLA Yamini Jadhav) या भायखळा विधानसभा मतदारसंघातून (Byculla Assembly constituency) आमदार आहेत.

 

Web Title :- Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil warning on yashwant jadhav case shivsena leader and mp sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा