यवत पोलिसांची मटका अड्ड्यावर धाड, तीन जेरबंद, मटका चालक फरार

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील खामगाव येथे सोमवार दिनांक १६ रोजी मुठा नदीचे काठी स्मशानभुमीचे शेडमध्ये मटका अड्डा बनवून तेथे मटका खेळणाऱ्या तीन जणांना यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे तर मटका चालक हा फरार झाला आहे.
[amazon_link asins=’B079H2P3PK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7524fbb7-89d4-11e8-b7f6-b5c34cbee30a’]

खामगाव येथील नदीकाठच्या स्मशानभूमी शेडमध्ये काही इसम कल्याण मटका या जुगाराचा खेळ घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना मिळाली होती. पो.नि.बंडगर यांनी तात्काळ या ठिकाणी पोलीस नाईक दिपक पालखे, गणेश झरेकर व संपत खबाले यांना छापा घालण्याबाबत आदेश दिले होते. वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन पंचासह या ठिकाणी छापा घातला असता चार इसम कल्याण मटका खेळ खेळत व खेळवित असताना मटका जुगारासाठी लागणारी साधने व २२० रोख रकमेसह मिळुन आले.

या मध्ये रमजान बशिर नदाफ वय २२ वर्षे, निलेश कचेर नितनवरे वय ३० वर्षे दोन्ही रा.रा. खामगाव. ता.दौंड. जि पुणे व मिलींद मोहन बडेकर वय ४४ वर्षे रा.ऊरूळी कांचन ता.हवेली जि.पुणे असे तिघेजण मिळुन आले तर मटका मालक भैय्या उर्फ प्रदीप संजय नागवडे रा.खामगाव ता.दौंड जि.पुणे हा पोलीसांची चाहुल लागताच शेतात पळुन गेला असून त्याचा शोध सुरू आहे.
हा छापा सोमवारी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास टाकण्यात आला होता.
[amazon_link asins=’B00VHZ53E0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’79e2aa5c-89d4-11e8-8b16-eb14b232c536′]

पोलीस काॅन्टेबल संपत खबाले यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा रजिस्टर नंबर ६६०/२०१८ म.जु.का.कलम १२ अ अन्वये गुन्हा दाखल करणेत आलेला असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक गणेश झरेकर हे करीत आहेत.