Pune Police MCOCA Action | हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या तिरुपती उर्फ टक्या लष्कर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 105 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | दोन वर्षांपूर्वी पापडे वस्ती येथे केलेल्या खूनात (Murder) पोलिसांना मदत केल्याच्या संशयावरुन हॉटेलमध्ये येऊन तोडफोड करत वार करुन परिसरात दहशत माजवणाऱ्या तिरुपती उर्फ टक्या विठ्ठल लष्कर व त्याच्या इतर 3 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 105 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

याप्रकरणी टोळी प्रमुख तिरुपती उर्फ टक्या विठ्ठल लष्कर (वय-21 रा. पापड वस्ती, पुणे), शुभम सुरेश करांडे (वय-22 रा. हडपसर, पुणे), अथर्व रविंद्र शिंदे (वय-21 रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 427, 352, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करुन शुभम करांडे याला अटक केली आहे.

हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा (Pune Police MCOCA Action) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) यांनी परिमंडळ- 5 पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास हडपसर विभागाचे (Hadapsar Division) सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (PI Vishwas Dagle),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले (PI Sandeep Shivle),
सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप (API Sarika Jagtap),
पोलीस उप निरीक्षक सुशील डमरे (PSI Sushil Damre),
निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे,
राजश्री खैरे, वसीम सय्यद, गिरीश एकोर्गे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा