Yavatmal News | यवतमाळमध्ये जमावाने एसटी बस पेटवली, सुदैवाने सर्व ७३ प्रवासी सुरक्षित

यवतमाळ : Yavatmal News | हातगाववरून नागपूरकडे निघालेली बस नागपूर-तुळजापूर महार्गावर (Nagpur Tuljapur Highway) धावत असताना उमरखेडजवळील पैनगंगा नदीच्या (Painganga River) पुलावर १० ते १२ अज्ञात लोकांनी ती अडवून पेटवून दिली. यावेळी प्रवासी ताबडतोब बसमधून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. रात्री उशीरा हा प्रकार घडला. यामुळे खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या परिसरात मराठा आंदोलन तीव्र झाले असून हा प्रकार नक्की कोणी केला याचा शोध पोलीस घेत आहेत. (Yavatmal News)

नांदेड जिल्ह्यातील विदर्भ-मराठवाडा (Vidarbha-Marathwada) सीमेवर हातगाव तालुक्यातील मार्लेगांव जवळ रात्री जमावाने एसटी बस (ST Bus) थांबवून पेटवून दिली. बसमधील ७३ प्रवासी ताबडतोब बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली.

या घटनेमागे मराठा आरक्षणाचे आंदोलक असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण विदर्भाच्या सीमेवरील हदगाव तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बस पेटवणारे कोण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. (Yavatmal News)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची तीव्रता राज्यभर वाढत चालली आहे.
ठिकठिकाणी मराठा बांधव साखळी उपोषण करत आहेत. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात
आल्याने आंदोलनाला वेगळे वळण लागत आहे. राजकीय नेत्यांना गावबंदीसोबतच काही ठिकाणी त्यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Govt Employees News | नोकरशहांवर सरकार मेहरबान, कारसाठी आता मिळणार १५ लाख रुपये; GR निघाला

Pimpri PCMC News | पिंपरी-चिंचवडला 2025 नंतरच दररोज पाणी मिळणार – मनपा आयुक्त शेखर सिंह

Modi Government | ओळख अथवा विवाहित असल्याचे लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांची शिक्षा, मोदी सरकार नवा कायदा करण्याच्या तयारीत

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच…, मोदींच्या शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर