येडियुरप्पा यांनी लिंगायत कार्ड खेळून BJP ला फसवले की, स्वत:च्या पायावर मारली कुर्‍हाड ?

बेंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आपली जात वीरशैव-लिंगायत ओबीसी वर्गात आणण्याचा प्रस्ताव आणून मोठा डाव खेळला आहे. त्यांनी या समाजाच्या विकासाठी लिंगायत विकास महामंडळ स्थापन करण्याचा सुद्धा प्रस्ताव ठेवला आहे. काही राजकीय तज्ज्ञ यास मास्टरस्ट्रोक म्हणत आहेत, तर कुणी यास पायावर कुर्‍हाड मारणे म्हटले आहे. दोन्ही निर्णयांकडे राज्यात जातीय आधारावर विभाजनाच्या धोका म्हणून पाहिले जात आहे. राजकीय वर्तुळात याची चर्चा सुद्धा आहे. जाहीरपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यामुळे नाराज आहे.

शुक्रवारी आपल्या मंत्रिमंडळात सर्वसंमतीची कमतरता आणि भाजपा केंद्रीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर ओबीसी वर्गात वीरशैव-लिंगायत समाजाला सहभागी करण्याच्या प्रस्तावाला अंतिम क्षणी सध्यासाठी स्थगित करण्यात आले आहे.

प्रत्याक्षात 78 वर्षीय येडियुरप्पा यांना कुणी जातीवर डाव खेळायला प्रेरित केले, यावर राजकीय तज्ज्ञ वेगवेगळे मत मांडत आहेत. काही लोकांचा तर्क आहे की, त्यांनी आपल्या पक्षात लिंगायतांचे समर्थन मजबूत करून आपली अस्थिर खुर्ची वाचवण्यासाठी असे केले आहे. इतरांना वाटत आहे की, हा केवळ एक ताबडतोब घेण्यात आलेला निर्णय आहे. यामुळे सरकार आणि भाजपासोबत त्यांचे संबंध आणखी खराब झाले आहेत.

अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीनंतर लिंगायत कर्नाटकमध्ये सर्वात मोठी जात आहे. महान समाज सुधारक बसवन्ना यांनी 12 व्या शतकात स्वत:ला वेगळा धर्म म्हणवणार्‍या सवर्ण शैवची लिंगायत म्हणून स्थापना केली होती. तेव्हा पासून ही जात राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या प्रभावशाली आहे. येडियुरप्पा यांना त्यांचा निर्विवाद नेता मानले जाते. त्यांना या समाजाचे प्रचंड समर्थन आहे. येडियुरप्पा यांनी लिंगायत विकास महामंडळाची स्थापना केल्यानंतर किमान 50 अन्य जातींसाठी समान बोर्ड आणि महामंडळांच्या स्थापनेची मागणी केली आहे.

काही खास सूत्रांनुसार, येडियुरप्पा यांच्या या पावलाने आरएसएसला त्रस्त केले आहे. आरएसएसचा अजेंडा हिंदू एकता आहे. संघाला वाटते की, येडियुरप्पा यांनी जाणिवपूर्वक किंवा नकळत असे काही केले आहे, जे आरएसएसने मागील काही वर्षात केले नाही. यामुळे आरएसएसची इमेज खराब झाली आहे.

You might also like