डेंग्यूच्या विळख्यात TV स्टार, ये रिश्ता … फेम अभिनेत्रीला देखील संसर्ग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिवसभर ऊन, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी बरसणाऱ्या पाऊसधारांमुळे मलेरिया, स्वाइन फ्लू आणि डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजरांची साथ पसरली आहे. याचा प्रादुर्भाव छोट्या पडद्यावरील कलाकरांनाही झाला आहे. नियति जोशी, मोहिसीन खान, जैन इमाम आणि ईशा सिंग या कलाकरांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही कार्यक्रमात मोहसीन खानच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री नियती जोशी हिला डेंग्यू झाला आहे. नियती जोशी हिने इंस्टाग्रामवर या बाबत माहिती दिली आहे. हॉस्पिटलच्या बेडवरचा फोटो पोस्ट करताना तिने म्हटले आहे की , ‘मी लवकरच परत येईन. डेंग्यू झाला आहे.’

नियती जोशीच्या आधी मोहिसीन खानला (कार्तिक) डेंग्यू झाला होता. ट्विटद्वारे चाहत्यांना माहिती देताना त्याने म्हंटले होते की , ‘डेंग्यू झाला आहे. इंशाल्लाह लवकरच ठीक होईल. बराच काळ घराबाहेर रहाताना सतर्क रहा.’

मोहसीन आणि नियतीच्या आधी जैन इमाम आणि ईशा सिंग यांनाही डेंग्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जैन इमाम सध्या ‘एक भ्रम सर्वगुण संपन्न’ या टीव्ही शो मध्ये भूमिका करत आहे. तर मोहिसीन खान आणि नियती जोशी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही कार्यक्रमात एकत्र काम करत आहेत.

Visit – policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like