धनगर आरक्षण : मुख्यमंत्र्यांना भाषणावेळी पिवळे झेंडे दाखवत घोषणा

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना त्यांना पिवळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केल्याची घोषणा हिंगोली या ठिकाणी घडली आहे. आमचेच सरकार तुम्हाला आरक्षण देणार आहे. असे मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले तसेच सभा संपताच आंदोलनकर्त्यांना भेटून मुख्यमंत्र्यांनी भावना जाणून घेतली आहे.

हिंगोली येथील रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गट आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसहित ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री दिलीप कांबळे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे आले होते. त्याच प्रमाणे आ.तान्हाजी मुटकुळे, माजीमंत्री सूर्यकांता पाटील, माजी खा. शिवाजी माने, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी आ.गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मिलींद यंबल, फुलाजी शिंदे, कैलास काबरा आदी नेते उपस्थित होते.

या शेतकरी मेळाव्यात भाषण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरुवात करताच आंदोलनकर्त्यांनी पिवळे झेंडे दाखवून सरकारचा निषेद करण्यास सुरुवात केली.धनगर-हटकर समाजाच्या आरक्षण देण्याची कार्यवाही हेच सरकार करेलअसे मुख्यमंत्री म्हणले तेव्हा आंदोलक घोषणा द्यायचे बंद झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम संपल्या नंतर आपण आंदोलकांना भेटून त्यांची भावना समजून घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. आमच्या काळात ५० हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे सरकारने तीन वर्षात १२ हजार कोटी रुपयांचा पीक विमा दिला आहे असे देवेंद्र फडवीस म्हणाले आहेत.