Yerawada Central Jail | धक्कादायक! येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा मृत्यू, कारगृह प्रशासनाने सांगितले ‘हे’ कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये (Yerawada Central Jail) तीन कैद्यांचा मृत्यु (Death of Prisoners) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजरामुळे झाला आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्युची (Sudden Death) नोंद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी एका कैद्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी कारागृहात (Yerawada Central Jail) गेले त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले.

 

शाहरुख बाबू शेख (वय-29 रा. कोंढवा), संदेश अनिल गोंडेकर (वय-26 रा. डोणजे, हवेली), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय-32 रा. मोरगाव, बारामती) असे मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत. संदेश गोंडेकर याच्यावर 2018 मध्ये खुनाचा (Murder) गुन्हा दाखल झाला असून तेव्हापासून तो येरवडा कारागृहात (Yerawada Central Jail) आहे. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमीतपणे जात होते. 31 डिसेंबरला त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यु झाल्याची माहिती देण्यात आली.

 

यानंतर संदेश याच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी कारागृह प्रशासन (Jail Administration) जबाबदार असल्याचे सांगत आक्षेप नोंदवला. यानंतर येरवडा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यु ‘लिव्हर सोरायसिस’ या आजाराने झाल्याचे स्पष्ट केले.

याशिवाय शाहरुख शेख व रंगनाथ दाताळ हे दोन्ही कैदी वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले होते. यातुनच त्या दोघांचा मृत्यू झाला. यासंदर्भात येरवडा कारागृह प्रशासनाने संबंधित मृत कैद्यांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यामार्फत कळवले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior Police Inspector Balkrishna Kadam)
यांनी सांगितले की, येरवडा कारागृहात असलेल्या गोंडेकर, शेख, दाताळ या तीन कैद्यांचा शनिवारी मृत्यू झाला.
या तिघांना वेगवेगळे आजार होते. या आजारपणातच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासात स्पष्ट झाले आहे.
संदेश याच्या कुटुंबीयांना त्यांच्या मुलाच्या मृत्यू बाबत शंका होती. त्याबाबत त्यांचा आणि डॉक्टरांचा संवाद साधून दिला.
त्यावेळी त्यांनी मृत्यूचे कारण सांगितले.

 

Web Title :- Yerawada Central Jail | pune three prisoners death in yerawada jail record of sudden death

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल