Yerawada Pune Crime | पुणे : बसमध्ये तरुणीसोबत असभ्य वर्तन, एकावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Yerawada Pune Crime | पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) महिला व तरुणींवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच कामानिमित्त बसने प्रवास करणाऱ्या महिलांसोबत असभ्य वर्तन करण्याचे प्रकार घडत आहेत. अशीच एक घटना येरवडा परिसरात घडली आहे. बसने प्रवास करणाऱ्या एका तरुणीसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत येरवडा येथे राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अशोक यशवंत रोडे Ashok Yashwant Rode (वय-40 रा. यशवंतनगर, येरवडा) याच्यावर आयपीसी 354, 354(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी फिनिक्स मॉल विमाननगर (Phoenix Mall Viman Nagar) कॉर्नर बस स्टॉपवरुन निगडी (Nigdi Bus Stop) बसमधून घरी जात होती. बस शास्त्रीनगर चौकाच्या (Shastri Nagar Kothrud) अलीकडे आली असता आरोपीने बसमधील गर्दीचा गैरफायदा घेत तरुणीच्या अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तरुणीसोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे (Mahesh Phatangre) करीत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

येरवडा : लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करुन दुसऱ्यांदा गरोदर केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सन 2016 ते मार्च 2024 या कालावधीत पीडितेच्या घरी व दिघी येथील लॉजवर (Dighi Lodge) घडला आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.17) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून राजअहमद वजिरबादशाहा दर्गावाले Rajahmad Wazirbadshah Dargwale (रा. येरवडा) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 376/2/ह, 417 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी आणि पीडित तरुणी यांच्यामध्ये 2016 पासून प्रेमसंबंध आहेत. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
पीडितेच्या घरी व दिघी येथील लॉजमध्ये नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले.
यातून ती दुसऱ्यांदा गरोदर राहिली. यानंतर आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फटांगरे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात