बँकांमधील पैसे बुडण्याची भिती वाटतेय तर ‘इथं’ गुंतवा पैसे, जास्त फायद्यासह मोदी सरकार घेतेय ‘गॅरंटी’,

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव बँकेवर आलेल्या संकटामुळे आता सर्वजन चिंतेत आहे. कारण लोकांनी अनेक बँकांमध्ये आपली बचतीची रक्कम जमा करुन ठेवलेली आहे. त्यामुळे अनेकांना चिंता आहे की जर आपली बँक बुडाली तर आपल्या बचतीची सर्व रक्कम पाण्यात जाईल.

1 लाख डिपॉजिट इंश्योरन्स –
सध्या बँकेच्या प्रत्येक खात्यावर 1 लाख रुपयांच्या डिपॉजिट इंश्योरन्स आहे. देशाच्या इतिहासात असे कधीही झाले नाही की व्यवसायिक बँक बुडाली. परंतू अशी प्रकरणे नक्की आहेत की तोट्यात असलेल्या बँकांचे विलिनिकरण दुसऱ्या बँकामध्ये झाले, जेणेकरुन कोणत्याही खातेदाराचे पैसे बुडणार नाही. सध्या डिपॉजिट इंश्योरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट गारंटी कॉर्पोरेशन स्कीमअंतर्गत बँकेत सेविंग अकाऊंट, करंट अकाऊंट, रिकरिंग डिपॉजिट, बँक फिक्स्ड डिपॉजिटवर 1 लाख रुपयांपर्यंतचा इंश्योरेन्स असतो, यात मूळ रक्कम आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाचा समावेश असतो. जर तुम्ही तुमच्याकडून गुंतवलेली रक्कम 100 टक्के सुरक्षित ठेवू इच्छितात कर त्यासाठी काही पर्याय आहेत.

1. गवर्नमेंट सेविंग बॉन्ड –
केंद्र सरकार 7 वर्षांसाठी 7.75 टक्के सेविंग्स बॉन्ड जारी करत आहे. सध्या बँकेत एफडी रेट्स कमी होत आहेत. अशात केंद्र सरकारकडून जारी करण्यात येणार बॉण्ड जास्त कालावधीच्या गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय आहे. या बॉण्डवर तुम्हाला सहा महिन्यावर किंवा मॅच्यूरिटीनंतर व्याज मिळते. ही रक्कम टॅक्सेबल असते, मॅच्यूरिटीवर व्याज मिळण्याच्या पर्यायाअंतर्गंत 10 लाख रुपये गुंतवणूकीवर 7 वर्षात तुम्हाला 17.03 लाख रुपये मिळतील.

2. पोस्ट ऑफिस योजना –
यंदा जानेवारीपासून आतापर्यंत आरबीआयने रेपोदरात 135 आधार अंकांनी कपात केली आहे आणि आणखी कपात करण्याची शक्यता आहे. परंतू यात चांगली बाब म्हणजे डिसेंबर महिन्यात सरकारने पोस्ट ऑफिस स्मॉल सेविंग स्कीमवर मिळणाऱ्या व्याजात कोणतीही कपात केली नाही. त्यामुळे जास्त कालावधीच्या गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदारांना ही योजना उत्तम आहे. नुकतीच इंडिया पोस्ट मोबाइल बँकिंगची सुविधा सुरु करण्यात आली आहे, ज्यात तुम्ही घर बसल्या योजनेत गुंतवणूक करु शकतात.

पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉजिटवर 1,2 आणि 3 वर्षासाठी 6.9 टक्क्यांच्या दराने व्याज मिळते, तर 5 वर्षासाठी 7.7 टक्क्यांना व्याज मिळते, ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांसाठी 8.6 टक्के व्याज मिळते. नॅशनल सेविंग सर्टिफिकेटवर व्याजदर 7.9 टक्के आहे. पोस्ट ऑफिस योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम सुरक्षित ठेवता येते.

3. गवर्नमेंट सिक्युरिटी –
केंद्र सरकार गवर्नमेंट सिक्युरिटी जारी करत असते. त्यामुळे यात गुंतवणूक करणे अत्यंत सुरक्षित समजले जाते, यात एक अट आहे की तुम्हाला मॅच्युरिटीपर्यंत पैसे काढता येत नाहीत. या सिक्युरिटीजला सेकेंडरी मार्केट म्हणजेच एनएसई प्लॅटफॉर्मवर खरेदी आणि विक्री करता येते.

4. पंतप्रधान व्यय वंदना योजना –
या योजनेत तुम्हाला 10 वर्षात 8 टक्क्यांने व्याज मिळेल. या अंतर्गंत गुंतवणूकदार हवे तर मासिक, तिमाही, सहामाही आधारे रेग्युलर इनकम मिळवू शकतात. ही एक सरकारी योजना आहे जी फक्त एलआयसीच ऑफर करते, याची अंतिम तारीख 31 मार्च 2020 आहे. एका वर्षात या योजनेंतर्गत जास्तीत जास्त 1.2 लाख रुपयांपर्यत पेंशन मिळू शकते.