ICC च्या नियमाचे ‘पालन’ करा ; भाजपच्या ‘या’ नेत्याचा धोनीला ‘सल्‍ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चालू असलेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात विकेट किपरची जबाबदारी सांभाळत असलेल्या महेंद्रसिंग धोनीने सैन्याचे चिन्ह असलेला ग्लोव्हज वापरल्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्हाला आयसीसीआयकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

आता या वादात भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेतली आहे. स्वामी यांनी धोनीला सल्ला दिला आहे. ते म्हणतात की धोनीने आयसीसीआयचा नियमाचे पालन केल्यास धोनीचे काहीही नुकसान होणार नाही. धोनीने हा वाद संपवून टाकला पाहिजे कारण देशाच्या विऱोधात असणाऱ्या शक्ती अशा प्रकरणांना वाढताना आनंद मानत आहेत.

स्वामी यांनी ट्विट करून म्हंटले की, मी न विचारता धोनीला सल्ला देत आहे. जर तुम्ही आयसीसीआयचा नियमाचे पालन केले तर तुमचे काहीही नुकसान होणार नाही. या वादाला पूर्णविराम द्या ज्यामुळे तुमच्या आतापर्यंतच्या प्रेरणादायी क्रिकेटमध्ये काहीही फरक पडणार नाही. भारताच्या विरोधातील शक्ती अशा वादाला पुढे चालू ठेऊ इच्छित आहेत.

महेंद्रसिंह धोनीने पॅरा कमांडोजचे मानचिन्ह असलेले ग्लोव्हज घातले होते, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. एकेकाळी सैनिक होण्याची इच्छा असलेल्या धोनीला सैन्याकडून मानद लेफ्टनंट कर्नल पदाची रँकिंग मिळालेली आहे. यांमुळे ते अभिमानाने ग्लोव्ह्जवर सैन्याचे चिन्ह लावू शकतात.