मुलीचा पाठलाग करणार्‍या तरुणाला न्यायालयाने सुनावली 22 महिन्याची ‘कठोर’ शिक्षा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे येथील एका मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला ठाण्याच्या विशेष न्यायालयाने 22 महिन्यांची कठोर सजा सुनावली आहे. साडेचार वर्षांनंतर याप्रकरणी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर आर वैष्णव यांनी दिला आहे. या निर्णयाची आता सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सुनिल कुमार दुखीलाल जायसवाल (वय 24) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनिल कुमार पीडित मुलीचा सतत पाठलाग करत होता. त्यामुळे पीडितेच्या वडीलांनी 2016 साली दोषी सुनिल कुमारच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या घटनेची सखोल तपासणी केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग केल्याचे निष्पन्न झाल आहे. त्यामुळे ठाण्याच्या विशेष न्यायालयाने मिळालेल्या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपीला 22 महिन्यांचा कठोर कारावास सुनावला आहे. तसेच आरोपीला 500 रुपयांचा दंडही आकारला आहे. या प्रकरणी पीडितेची बाजू वकिल उज्ज्वला मोहोळकर यांनी मांडली आहे.