Coronavirus : ‘घातक’ झाला ‘कोरोना’ ! तरूण, धष्टपुष्ट आणि तंदुरूस्त लोकांचा देखील जातोय ‘जीव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत 3100 हून अधिक लोक आणि ब्रिटनमधील 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या देशांमध्ये आता कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्याचबरोबर इटली आणि स्पेनमध्ये कोरोनामुळे वाईट परिणाम झाला आहे. परंतु मृत्यूच्या वाढत्या आकडेवारीत एक गोष्ट समोर येत आहे की बरेच तरुण, निरोगी आणि तंदुरुस्त लोकांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

काही तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाचा वृद्धांना जास्त धोका आहे असे जेव्हा म्हटले गेले तेव्हा तरूणांना वाटले की ते सुरक्षित आहे. मात्र बर्‍याच देशांमध्ये, तरुणांनी निर्बंध स्वीकारले नाहीत आणि त्यांनी पार्टी करणे चालू ठेवले. यामुळे कोरोना संसर्ग होण्यास आणखी सोपे झाले. परंतु आता अशी बर्‍याच प्रकरणे समोर येत आहेत ज्यात निरोगी तरुणांचेही कोरोनाने मृत्यू झाले आहे.

डेली मेलच्या अहवालानुसार, उत्तर लंडनमध्ये राहणारा अ‍ॅडम हार्किन्स एकदम फिट होता. तो केवळ 28 वर्षांचा होता, परंतु आता त्याचे नाव कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या तरुणांमध्ये सामील झाले आहे. त्याला इंड्यूस्ड कोमामध्ये ठेवण्यात आले होते, परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. त्याची आई जॅकी म्हणाल्या की, तो खूप स्वस्थ होता.

त्याचबरोबर भारतीय मुलगी पूजा शर्मा बर्मिंघममध्ये राहत होती. कोरोनामुळे 33 वर्षाच्या पूजाचेही निधन झाले आहे. एक दिवस आधी तिचे वडील सुधीर शर्मा यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते.

आपण कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या एकूण मृतांचे विश्लेषण केले तर तेथे मोठ्या संख्येने वृद्ध लोक आहेत. पण आता कोरोना तरुणांचा जीव घेत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या देशांमध्ये आरोग्य सेवा चांगली नाही तेथे जास्त लोक मरण पावले आहेत.

बर्‍याच अहवालांमध्ये असे दावे केले गेले आहेत की, बहुतेक तरुणांना कोरोनामधून थोडासा ताप येण्याची लक्षणे दिसतील किंवा काहींना सौम्य लक्षणे दिसणार नाहीत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोज ए. गॅब्रियसियस यांनीही गेल्या आठवड्यात म्हटले आहे की, तरुण आणि निरोगी लोक साथीच्या रोगात सापडणार नाही. वृद्धांना सर्वात जास्त त्रास होईल, मात्र असे नाही की तरुण मुले सुरक्षित राहतील कारण कोरोना त्यांनाही सोडणार नाहीत.

एका आकडेवारीनुसार, अमेरिकेतील रूग्णालयात दाखल झालेल्या 500 रूग्णांपैकी 20 टक्के म्हणजेच सुमारे 100 लोक 20 ते 44 वर्षे वयोगटातील होते. कोरोना संबंधित आयसीयूमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक 10 जणांपैकी एक तरुण देखील होता.

लीड्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चचे व्हायरस तज्ज्ञ स्टीफन ग्रिफिन यांचे म्हणणे आहे की, प्रत्येकाला धोका आहे. प्रत्येक वेळी जेव्हा एखादी व्यक्ती संक्रमित होते, तेव्हा त्याचा संघर्ष सुरू होतो. कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाही. लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये संसर्गजन्य रोगांची तज्ञ नथाली मॅकडरमॉट म्हणतात की, आम्ही 20 ते 39 वर्षांच्या दरम्यानच्या लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाल्याचे पाहिले आहे. काही लोकांना आधीपासूनच काही आरोग्याच्या समस्या असतात, बर्‍याच जणांना नसते.

अशाच एका घटनेत आयर्लंडमधील केरी येथे राहणाऱ्या मिशेल प्रेन्डरगस्ट यांचेही कोरोनामुळे निधन झाले. ते फिट आणि निरोगी होते. ते जिममध्येही जायचे. मिशेल फक्त 28 वर्षांचे होते.