धक्कादायक ! क्रिकेट सामन्यादरम्यान युवा खेळाडूचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : क्रिकेट आणि चाहत्यांसाठी एक दुर्दैवी घटना समोर आली असून क्रिकेटच्या मैदानात सामन्यादरम्यान एका युवा खेळाडूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सत्यजीत प्रधान असे या युवा खेळाडूचे नाव आहे.

सत्यजित ओडिसातील केंद्रपाडा येथील देरावीश महाविद्यालयामध्ये बारावीत शिकत होता. मैदानात क्रिकेटचा सामना खेळत असताना त्याला अचानक चक्कर आली. चक्कर आल्यावर सर्व खेळाडू त्याच्या जवळ धावले. संघाच्या डॉक्टरांनीही त्याच्याकडे लगेचच धाव घेतली. डॉक्टरांनी काही प्रथमोपचार करायला सुरुवात केली. पण सत्यजित कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नव्हता. त्यांनतर त्याची तब्येत नाजूक असल्याचे समजटाच त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला.

परंतु, हॉस्पिटमध्ये पोहोचण्यापूर्वीच सत्यजितचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, त्याच्या शवविच्छेदनाची प्रक्रीया करण्यात आलेली असून त्याचा मृत्यू हा हार्ट अ‍ॅटॅकने झाल्याचे म्हटले जात आहे. पण या क्रिकेटपटूंच्या मृत्यूने खळबळ आहे.