मुस्लीम युवकाशी मैत्री केल्याने पोलिसांची तरूणीला मारहाण

मेरठ : वृत्तसंस्था

मुस्लीम मुलाशी मैत्री केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी एका तरूणीला मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये पोलीस धर्मावरुन तरुणीला आक्षेपार्ह प्रश्न विचारताना व मारहाण करताना दिसत आहेत. दरम्यान या प्रकारांनतर सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागल्याने तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aa4d1c6e-c14e-11e8-9bfa-7d5d23169711′]
पीडित तरुणी त्याच्या एका मुस्लीम मित्राला भेटायला गेली होती. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने या तरुणाच्या घरात प्रवेश केला. त्यांनी या दोघांना मारहाण केली. नंतर दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विश्व हिंदू परिषद संघटनेला त्या दोघांची मैत्री मान्य नसल्याने त्यांना अद्दल घडविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या गाडीत जेव्हा मुलीला नेण्यात आले. तेव्हा एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. ज्यामध्ये पोलीस तरुणीला मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नंतर इंटरनेटवर व्हायरल झाला. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नेटिजन्सच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार दिसत असून ते वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीला मारहाण करताना, अपमानित करताना दिसत आहेत. मुस्लीम मित्र केल्याबद्दल पोलीस आक्षेपार्ह भाषेचा वापरही करताना दिसत आहेत. याविषयी येथील पोलीस अधीक्षक रणविजय सिंह म्हणाले, व्हिडिओमध्ये दिसणारे तीन पोलीस ज्यामध्ये एका महिला हवालदाराचाही समावेश आहे, त्यांना निलंबित करण्यात आले आहे.