home page top 1

प्रेमासाठी काय पण ! बुरखा घालून फिरत होता तरुण, पोलिसांनी पकडल्यानंतर समोर आली ‘लव्ह स्टोरी’

लखनौ : वृत्तसंस्था – प्रेमासाठी काहीही करणाऱ्या, जोडप्यांची आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत. लोक म्हणतात की प्रेम आणि युद्धामध्ये सर्वकाही न्याय्य आहे. यूपीची राजधानी लखनौध्येही एक असाच प्रकार घडला ज्याची मोठ्या प्रेमावर चर्चा होत आहे. येथील एक तरुण आपल्या मैत्रिणीला भेटायला बुरखा घालून म्हणजेच स्त्री बनून घराबाहेर पडला. मात्र, पोलिसांनी संशय आल्याने त्याला पकडले आणि त्याची मैत्रिणीला भेटण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिली.

अशी घडली घटना :
लखनऊमध्ये संशयास्पद हालचालींमुळे चौकशीसाठी पोलिसांनी बुरखा घातलेल्या एका युवकाला पकडले. पोलिसांनी मुलागा असूनही तो बुरखा घालून फिरत असल्याचे कारण विचारले असता, त्या युवकाने पोलिसांसमोर आपली संपूर्ण प्रेमकथा सांगितली.आपल्या कुटुंबीयांनी ओळखू नये म्हणून तो बुरखा घालून आपल्या मैत्रिणीला भेटायला जात असल्याचे या युवकाने पोलसांना सांगितले. मुलाला बुरखा घातलेला पाहून तेथून येणार्‍या लोकांची गर्दी जमली आणि त्यांनी त्या मुलाचा फोटो काढण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी घटनास्थळाहून तरूणच्या घरी फोन करून घटनेची चौकशी केली आणि त्याच्या म्हणण्याची खात्री पटवून घेतली. त्याचे आणि कुटुंबियांचे म्हणणे पडताळून सत्यता पटल्यानंतरच पोलिसांनी त्याला पुन्हा अशी चूक न करण्याची सूचना केली आणि कुटुंबातील सदस्यांच्या स्वाधीन केले. एवढे धाडसी पाऊल उचलून तो तरुण बुरखा घालूनही आपल्या मैत्रिणीला भेटू शकला नाही पण त्याचे वागणे आणि घडलेली घटना मात्र लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Loading...
You might also like