30 रुपये मागितल्याच्या कारणावरून मित्रानेच केला मित्राचा खून

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जत तालुक्यातील मुचंडी येथील एक खळबळजनक घटना प्रकार मंगळवारी घडला आहे. मुचंडी येथे ३० रुपये मागितल्याचा कारणावरून एका युवकाचा त्याच्या मित्रानेच गळा हाताने दाबून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केली आहे. अरुण शामू मलमे (वय, २०) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेबाबत तक्रार मृत युवकाचे वडील शामू गुंडा मलमे यांनी दिली आहे. यावरून संशयीत आरोपी रमेश फकीराप्पा पाटोळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, मुचंडी गावापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या तोळबळवाडी गावातअरुण मलमे आणि रमेश पाटोळे राहत होते. हे दोघे मित्र होते. तर आज मंगळवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान संशयित रमेश पाटोळे हा अरुणला ३० रुपये देण्यासाठी गेला. त्यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी रमेशने अरुणचा गळा धरून हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारून ढकलून दिले. तसेच अरुण खाली कोसळल्यानंतर रमेशने त्याच्या छातीवर बसून अरुणला जखमी केले. यातच अरुणच्या मृत्यू झाला. आणि तेथून रमेश फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. पंचनामा केला आह. आरोपी फरार असून पोलिस शोध घेत आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.